काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?
तुम्हाला आठवतंय का अलीकडेच सोशल मीडयावर घिबली ईमेजचा ट्रेंड सुरु झाला होता. नेत्यांपासून सेलिब्रिटिंपर्यंत सर्वजण घिबली ईमेज तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत होते. AI टूल्स चॅटजीपीटी आणि ग्रोक घिबली ईमेज तयार करण्यात आघाडीवर होते. सर्वांनाच घिबलीचे वेड लागले होते. तसेच घिबली ईमेज तयार करणं देखील अत्यंत सोपं होतं. घिबली ईमेजनंतर आता पुन्हा AI चे एक नवीन फीचर ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर यासंबंधित अनेक रिल्स देखील व्हायरल होत आहेत.
iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल
Gemini AI च्या या नव्या फीचरने सर्वांना भुरळ घातली आहे. Miniature Action Figure Generator असं Gemini AI च्या या नवीन फीचरचं नावं आहे. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर किंवा अॅपवर Gemini AI ओपन करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटो अपलोड करून एक प्रॉम्प्ट द्यावा लागणार आहे. त्यानंतर काही क्षणातच तुमच्यासमोर एक AI ने तयार केलेला फोटो दिसेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Gemini AI ने हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध केले आहे. म्हणजेच अगदी फ्री आणि पेड दोन्ही युजर्स Gemini AI च्या या फीचरचा वापर करून त्यांचे अनोखे फोटो तयार करू शकतात. (फोटो सौजन्य – AI Created)
खरं तर AI मुळे प्रत्येकाला त्यांच्या काल्पनिक जगात वावरण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला जसे पाहिजे तसे फोटो आपण AI च्या मदतीने तयार करू शकतो. म्हणजेच तुम्ही घरबसल्या एखाद्या जंगलात फिरत असल्याचा फोटो देखील तयार करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची देखील गरज नसते. केवळ AI वर फोटो अपलोड करा आणि प्रॉम्प्ट द्या, यानंतर अवघ्या काही क्षणातच तुमचा काल्पनिक फोटो तयार होईल. याच कारणमुळे AI ने तयार केलेले फोटो प्रचंड व्हायरल होतात आणि या फोटोंना लोकांची पसंती मिळते. असंच आता Gemini AI चं नवीन फीचर देखील व्हायरल होत आहे.
जेमिनी एआयच्या एका अनोख्या नवीन वैशिष्ट्याद्वारे तयार केलेले डिजिटल अॅक्शन फिगर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. युजर्स त्यांचे पोर्ट्रेट, ग्रुप फोटो आणि अगदी मोटारसायकल चालवणे किंवा कार चालवणे यासारख्या दैनंदिन अॅक्टिव्हिटी डेस्कवर प्रदर्शित केलेल्या व्यावसायिक एकत्रित आकृत्यासारखे दिसणाऱ्या डिजिटल लघुचित्रांमध्ये रूपांतरित करत आहेत. हा ट्रेंड इंस्टाग्राम, टिकटॉक आणि एक्सवर वेगाने व्हायरल झाला आहे, तर गेल्या दोन दिवसांत गुगल ट्रेंड्स सर्चमध्ये “प्रॉम्प्ट जेमिनी एआय”, “गुगल जेमिनी मिनिअॅरिक्स” आणि “अॅक्शन फिगर” सारख्या कीवर्डसह वर्चस्व गाजवत आहे.
गुगलने त्यांचे नवीनतम वैशिष्ट्य, जेमिनी २.५ फ्लॅश इमेज (नॅनो बनाना) लाँच केल्यानंतर ही क्रेझ निर्माण झाली. पारंपारिक फोटोग्राफी किंवा 3D मॉडेलिंगच्या विपरीत, या वैशिष्ट्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची किंवा डिझाइन कौशल्याची आवश्यकता नाही. एकदा प्रॉम्प्ट सबमिट केल्यानंतर, AI एका मिनिटापेक्षा कमी वेळात डिजिटल लघुचित्र तयार करते.