Free Fire Max: Garena ने जारी केले नवे गेमिंग कोड! वेपन स्किन आणि Emote फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्णसंधी
बॅटल रॉयल गेममधील सर्वात लोकप्रिय गेम्सपैकी एक म्हणजे गरेना फ्री फायर मॅक्स. गेमिंगच्या जगात गरेना फ्री फायर मॅक्सने धुमाकूळ घातला आहे. भारतातील लाखो ऑनलाईन गेमर्स गरेना फ्री फायर मॅक्स खेळतात. असे देखील अनेक गेमर्स आहेत, जे गरेना फ्री फायर मॅक्सची लाईव्ह स्ट्रिमिंग करून पैसे कमावतात. याशिवाय टूर्नामेंट आणि गेमद्वारे देखील मोठ्या प्रमाणात पैसे कमावले जातात. जबरदस्त ग्राफिक, गेमप्ले आणि गेमिंग आइटम्स यामुळे गेमर्स गरेना फ्री फायर मॅक्सकडे अधिक आकर्षित होतात.
गरेना फ्री फायर मॅक्सचा गेमरबेस करोडोंच्या संख्येत आहे. हा गेम प्रचंड लोकप्रिय आहे. याच कारणामुळे गेम डेवलपर कंपनी मजेदार आणि जबरदस्त अपड्टेस जारी करत असते. गेमर्सना प्रीमियम आइटम जसे की स्किन, लूट क्रेट, इमोट, बंडल, पेट आणि कॅरेक्टर इत्यादी गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी गेममध्ये ईव्हेंट आयोजित केले जातात. याशिवाय गेमिंग आयटम्स मिळवण्याचा दुसरा उपाय म्हणजे रिडीम कोड. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड असे गेमिंग कोड आहेत, ज्यामध्ये प्लेअर्सना गेमिंग आयटम्स मोफत मिळवण्याची संधी मिळते. यासाठी गेमर्सना डायमंड देखील खर्च करावे लागत नाही. मात्र हे रिडीम कोड्स ठरावीक काळापुरते मर्यादित असतात. त्यामुळे जर तुम्हाला रेडिम कोड्सच्या मदतीने गेमिंग आयटम्स पाहिजे असतील, तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. Free Fire Max चे रिडीम कोड रीजन स्पेसिफिक असतात. या स्पेशल कोडची संख्या 16 अंकी असते.






