15 कोटींहून अधिक युजर्सचा Data Leak! जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम आणि नेटफ्लिक्स अकाउंट्स धोक्यात, तात्काळ बदला पासवर्ड!
शेअर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, लीक झालेल्या डेटमध्ये जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम, नेटफ्लिक्स, याहू आणि आउटलुक सारख्या मोठ्या आणि लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सवरील अकाऊंट्सचा समावेश आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, 48 मिलियन जीमेल अकाऊंट, 17 मिलियन फेसबुक अकाऊंट, 6.5 मिलियन इंस्टाग्राम अकाऊंट, 3.4 मिलियन नेटफ्लिक्स अकाऊंट, 4 मिलियन याहू अकाऊंट आणि 1.5 मिलियन आउटलुक अकाऊंट या मोठ्या डेटा लीकचा भाग आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
नुकत्याच शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, ज्या डेटाबेसचा खुलासा करण्यात आला आहे, त्यामध्ये एकूण 149,404,754 यूनिक यूजरनेम आणि पासवर्ड समाविष्ट होते. हा संपूर्ण डेटा सुमारे 96GB चा होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हा डेटा पासवर्ड-प्रोटेक्टेड नव्हता आणि एन्क्रिप्टेड देखील नव्हता. सुरुवातीला ईमेल आईडी, यूजरनेम, पासवर्ड आणि डायरेक्ट लॉगिन किंवा ऑथराइजेशन यूआरएल देखील दिसले होते.
रिसर्चरनुसार, या डेटाबेसमध्ये समाविष्ट असलेले लॉगिन डिटेल्स कोणत्याही एका देशापर्यंत मर्यादित नव्हते. यामध्ये जगभरातील यूजर्सची माहिती उपलब्ध होती आणि त्यात जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या ऑनलाइन सेवेशी संबंधित अकाउंट्स आढळले. ज्यामुळे हा डेटा लीक आणखी जास्त धोकादायक मानला जात आहे.
डेटाच्या मर्यादित पुनरावलोकनादरम्यान, असा दावा करण्यात आला की, या डेटा लीकमध्ये बँकिंग सर्विसेज, क्रेडिट कार्ड अकाऊंट्स, क्रिप्टो वॉलेट्स आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्ससंबंधित लॉगिन क्रेडेंशियल्स देखील समाविष्ट होते. यामुळे ऑनलाइन फ्रॉड, फाइनेंशियल स्कॅम आणि आइडेंटिटी थेफ्टचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
साइबर एक्सपर्ट्सने यूजर्सना सल्ला दिला आहे की, यूजर्सनी त्वरीत त्यांच्या सर्व महत्त्वाच्या अकाऊंट्सचे पासवर्ड बदलणं गरजेचं आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगळा आणि मजबूत पासवर्ड ठेवा, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) ऑन करा आणि कोणत्याही संशयास्पद ईमेल किंवा मेसेजवर क्लिक करू नका. याव्यतिरिक्त, अकाऊंट लॉगिन क्रियाकलाप नियमितपणे तपासणे महत्वाचे आहे.






