Gmail (Photo Credit- X)
गुगलने जगभरातील 200 कोटींहून अधिक Gmail वापरकर्त्यांसाठी एक गंभीर इशारा जारी केला आहे. अलीकडेच झालेल्या एका डेटा लीकमधून हॅकर्स आता अधिक आक्रमकपणे वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे, गुगलने प्रत्येकाला लवकरात लवकर आपला पासवर्ड बदलण्याचा आणि अकाउंटची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे.
काही काळापूर्वी गुगलने स्वतःच मान्य केले होते की त्यांच्या Salesforce सिस्टीमवर सायबर हल्ला झाला होता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात जो डेटा लीक झाला, ती सार्वजनिकपणे उपलब्ध असलेली व्यावसायिक माहिती होती. यामुळे थेट Gmail किंवा Google Cloud वापरकर्त्यांच्या डेटावर परिणाम झाला नाही. मात्र, हॅकर्सनी याच माहितीचा वापर करून मोठे सायबर हल्ले करण्याची योजना आखली आहे.
गुगलच्या माहितीनुसार, ‘ShinyHunters’ नावाच्या एका सायबर गुन्हेगार गटाने या डेटा लीकचा फायदा घेतला आहे. ते आता सोशल इंजिनिअरिंग अटॅकच्या मदतीने Gmail वापरकर्त्यांना टार्गेट करत आहेत. यामध्ये हॅकर्स स्वतःला IT सपोर्ट कर्मचारी असल्याचे भासवून युजर्सकडून त्यांचा पासवर्ड मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही प्रकरणांमध्ये ते अकाउंटमध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी देखील झाले आहेत.
गुगलने स्पष्ट केले आहे की, आता या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पासवर्ड बदलण्यासोबतच, कंपनीने ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ (2FA) चालू करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे तुमचा पासवर्ड जरी हॅक झाला तरी तुमच्या फोनवर आलेल्या OTP शिवाय कोणीही तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश करू शकणार नाही. याव्यतिरिक्त, तुमच्या अकाउंटवर कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित लक्ष देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. गुगलने 8 ऑगस्ट रोजीच या सायबर हल्ल्याने प्रभावित झालेल्या सर्व वापरकर्त्यांना ईमेलद्वारे माहिती दिली होती.
कम्प्युटरवर पासवर्ड बदलण्यासाठी: 1. तुमच्या Google Account वर जा. 2. डाव्या बाजूला ‘Security’ वर क्लिक करा. 3. ‘Signing in to Google’ सेक्शनमध्ये ‘Password’ निवडा. 4. पुन्हा एकदा साइन इन करून नवीन पासवर्ड टाका. 5. ‘Change Password’ वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करा.
अँड्रॉइड फोनवरून पासवर्ड बदलण्यासाठी: 1. तुमच्या फोनच्या ‘Settings’ मध्ये जा. 2. ‘Google > Manage your Google Account’ निवडा. 3. सर्वात वरच्या बाजूला ‘Security’ टॅबवर जा. 4. ‘Signing in to Google’ मध्ये ‘Password’ निवडा. 5. पुन्हा साइन इन करून नवीन पासवर्ड टाका. 6. ‘Change Password’ वर टॅप करा.
iPhone किंवा iPad वर पासवर्ड बदलण्यासाठी: 1. Gmail ॲप उघडा आणि वरच्या उजव्या बाजूला तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. 2. ‘Manage your Google Account’ निवडा. 3. ‘Personal info’ सेक्शनमध्ये जा. 4. ‘Password’ वर टॅप करा. 5. पुन्हा साइन इन करून नवीन पासवर्ड टाका. 6. ‘Change Password’ वर टॅप करून प्रक्रिया पूर्ण करा.
गुगलने दिलेला हा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण, पासवर्ड चोरीला गेल्यास केवळ ईमेलच नाही तर तुमचे बँकिंग, सोशल मीडिया आणि इतर अनेक अकाउंट्सही धोक्यात येऊ शकतात. म्हणून, तुमचा पासवर्ड आत्ताच बदला आणि सुरक्षेसाठी ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ (2FA) नक्की चालू करा.