WhatsApp ने एक वापरकर्त्यांसाठी एक खास अपडेट जारी केले आहे. हे अपडेट विशेषतः iOS आणि Mac अॅप वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. Apple वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी WhatsApp ने हे अपडेट आणले आहे. कंपनीने म्हंटले आहे की हॅकर्स अॅपमधील त्रुटींचा फायदा घेऊन वापरकर्त्यांची हेरगिरी करत होते. अॅपल वापरकर्त्यांना प्रभावित करणाऱ्या बग्सचे निराकरण करण्यासाठी व्हॉट्सअॅपने दोन सुरक्षा पॅच जारी केले आहेत. कंपनीने दुरुस्त केलेल्या बगमध्ये CVE-2025-55177 आणि CVE-2025-43300 यांचा समावेश आहे.
Apple ने आधीच केले सतर्क
Apple ने आधीच वापरकर्त्यांना या बग्सबद्दल सतर्क केले होते. Apple ने म्हटले होते की या बग्सचा वापर करून हॅकर्सनी काही विशिष्ट लोकांच्या डिव्हाइसवर हल्ला केला होता. आजकाल, या बग्सबद्दल असे सांगितले जात आहे की हॅकर्स झिरो-क्लिक एक्सप्लॉयट तंत्राद्वारे वापरकर्त्यांचे डिव्हाइस हॅक करत होते. यामध्ये, हॅकर्स वापरकर्त्याने लिंकवर टॅप न करता किंवा फाइल उघडल्याशिवाय डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकतात.
हा कसा बग कधी आला समोर?
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की हा बग मे महिन्याच्या अखेरीपासून सक्रिय होता, ज्यामध्ये हॅकर्स त्यांच्या लक्ष्यित वापरकर्त्याच्या आयफोन आणि मॅकबुकमधून डेटा चोरण्यासाठी त्याचा फायदा घेत होते. सिक्युरिटी लॅबचे प्रमुख डोन्चा ओ सीअरभैल यांनी याला “प्रगत स्पायवेअर मोहीम” असे नाव दिले आणि सांगितले की हॅकर्स डेटा चोरण्यासाठी त्याचा फायदा घेत आहेत.
किमान २०० वापरकर्ते प्रभावित
Meta च्या प्रवक्त्या Margarita Franklin यांनी TechCrunch ला सांगितले की त्यांना काही आठवड्यांपूर्वी हा बग सापडला. त्यांनी सांगितले की या बगमुळे किमान 200 वापरकर्ते प्रभावित झाले आहेत. या हल्ल्यात कोण सामील होते याबद्दल मेटाने अद्याप माहिती शेअर केलेली नाही. सुरक्षा तज्ञांचे म्हणणे आहे की या दोन बगमुळे हॅकर्स थेट Apple डिव्हाइसेसमधून डेटा चोरू शकतात.
Zero-click Exploits म्हणजे काय?
झिरो-क्लिक एक्सप्लॉइट्स बग्स खूप धोकादायक असतात. ते वापरकर्त्यांना जवळजवळ कोणतीही सुरक्षा देत नाहीत. या बगमुळे कोणतेही डिव्हाइस सहजपणे हॅक केले जाऊ शकते. कोणत्याही बग्सपासून सुरक्षित राहण्यासाठी, वापरकर्त्यांनी त्यांच्या डिव्हाइसेसमध्ये नवीनतम सॉफ्टवेअर स्थापित करावे.
लाँचपूर्वीच iPhone 17 Pro ची चर्चा, iPhone 16 Pro पेक्षा ‘हे’ फीचर्स असतील अधिक दमदार!