स्मार्टफोन युजर्सची स्कॅमर्सपासून होणार सुटका, गूगलने एकाच वेळी लाँच केले पाच नवीन फीचर्स
ऑनलाईन स्कॅम आणि फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही नागरिक सतर्कतेने या स्कॅमर्सच्या जाळ्यातून सुटतात. मात्र ज्यांना सध्या होत असलेल्या स्कॅम आणि फसवुणकीच्या वाढत्या घटनांबद्दल माहित नाही. असे नागरिक स्कॅमर्सच्या बोलण्याला भुलतात. याच सर्व समस्या लक्षात घेत आता गूगलने 5 नवीन फीचर्स लाँच केले आहेत, जे स्मार्टफोन युजर्सचा स्कॅमर्सपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. आंतरराष्ट्रीय कॉलर्स और कॉन्टॅक्ट वेरिफिकेशन संबंधित फिचर्सचा देखील यामध्ये समावेश आहे.
हेदेखील वाचा- गूगल मॅपवरून सीएनजी पंप आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधणं झालं अधिक सोपं, प्रोसेस अगदी Easy
गूगलने सांगितलं आहे की, वापरकर्त्यांना या वर्षाच्या अखेरीस धोकादायक लिंक्सबद्दल चेतावणी दिली जाणार आहे. जगातील सर्व सरकारे आणि अनेक तंत्रज्ञान कंपन्या स्पॅम आणि घोटाळे थांबवण्यासाठी काम करत आहेत, पण ते थांबत नाही. आता गूगल आपल्या मॅसेंजर ॲप गूगल मॅसेजसाठी अनेक नवीन वैशिष्ट्ये जारी करत आहे, ज्याचा उद्देश वापरकर्त्यांची गोपनीयता सुधारणे आणि त्यांचं संशयास्पद कॉल आणि संदेशांपासून संरक्षण करणे आहे.
या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे पॅकेज डिलीवरी आणि जॉब्सशी संबंधित फसव्या टेक्स्ट्सपासून संरक्षण, जे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल वापरते. याशिवाय इंटरनॅशनल कॉलर्सशी संबंधित फीचर्स आणि कॉन्टॅक्ट व्हेरिफिकेशनचाही समावेश आहे. गूगलने सांगितलं आहे की, ते वापरकर्त्यांना या वर्षाच्या अखेरीस धोकादायक लिंक्सबद्दल चेतावणी देईल. (फोटो सौजन्य – pinterest)
सुधारित स्पॅम संरक्षण: मॅसेज ॲपचे बीटा वापरकर्ते ज्यांनी स्पॅम संरक्षण चालू केले आहे त्यांना आता एक नवीन वैशिष्ट्य मिळणार आहे. हे नवीन फीचर पॅकेज डिलीवरी आणि जॉब्सशी संबंधित संभाव्य फसवे टेक्स्ट्स शोधते आणि ते ऑटोमॅटिक स्पॅम फोल्डरमध्ये ठेवते. हे फीचर ऑन-डिव्हाइस मशीन लर्निंग (ML) वापरते. गूगलने दावा केला आहे की टेक्स्ट मॅसेज जोपर्यंत स्पॅम म्हणून नोंदवले जात नाहीत तोपर्यंत ते खाजगी राहतात.
संभाव्य धोकादायक लिंक: गूगल सध्या भारत, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर येथे एक पायलट चालवत आहे जे वापरकर्त्यांना अज्ञात सेंडर्सकडून मिळणाऱ्या संभाव्य धोकादायक दुव्यांबद्दल सावध करतात आणि त्यांना ब्लॉक करतात. हे वैशिष्ट्य या वर्षाच्या अखेरीस जागतिक स्तरावर लाँच केलं जाणार आहे.
हेदेखील वाचा- Apple iPhone 16 डिस्प्लेच्या समस्येमुळे युजर्स नाराज! मिड-रेंज अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षा खराब रेटिंग
संवेदनशील कंटेंट चेतावणी: गूगलने त्याच्या संदेश ॲपसाठी संवेदनशील कंटेंट चेतावणी म्हणजेच Sensitive Content Warnings फीचर लाँच केलं आहे. हे फीचर स्पष्ट कंटेट ब्लर करते आणि वापरकर्त्यांना ते पाहण्याचा पर्याय प्रदान करते. ते फॉरवर्ड करताना, ते एक चेतावणी देते, जेणेकरून वापरकर्त्यांना त्याबद्दल माहिती मिळेल.
आंतरराष्ट्रीय सेंडर्सकडून संरक्षण: गूगल मॅसेज लवकरच अज्ञात आंतरराष्ट्रीय सेंडर्सकडून प्राप्त झालेले टेक्स्ट मॅसेज ऑटोमॅटिक लपवेल. हे संदेश स्पॅम आणि ब्लॉक केलेल्या फोल्डरमध्ये जातील. हे वैशिष्ट्य या वर्षाच्या अखेरीस सिंगापूरमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून लाँच होईल आणि हळूहळू इतर प्रदेशांमध्ये रिलीज केले जाईल.
कॉन्टॅक्ट वेरिफिकेशन: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणारे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कॉन्टॅक्ट वेरिफिकेशन. यासह, वापरकर्ते संदेश पाठविण्यापूर्वी त्यांच्या संपर्कांचे पब्लिक व्हेरिफेकिशेन करण्यास सक्षम असतील. यासाठी गूगल एक युनिफाइड पब्लिक व्हेरिफिकेशन सिस्टम विकसित करत आहे, जी क्यूआर कोड वापरते.