फोटो सौजन्य - Social Media
WhatsApp लवकरच एक भन्नाट फीचर घेऊन येणार आहे, ज्यामुळे वापरकर्ते अशा लोकांशीही चॅट करू शकतील ज्यांच्याकडे WhatsApp इंस्टॉल नाही किंवा अकाउंट सुद्धा नाही! हे नवीन “Guest Chats” फीचर सध्या Android बीटा व्हर्जन 2.25.22.13 मध्ये टेस्टिंग स्टेजमध्ये आहे आणि लवकरच ते अधिकृतपणे रोलआउट होण्याची शक्यता आहे.
हे फीचर नेमकं कसं काम करणार?
Guest Chats फीचर अंतर्गत, WhatsApp वापरकर्ते एक खास इनवाइट लिंक पाठवून नॉन-यूझर्ससोबत चॅट सुरू करू शकतील. लिंकवर क्लिक करताच समोरच्याला एक सुरक्षित वेब इंटरफेस उपलब्ध होईल, ज्यावरून ते WhatsApp Web प्रमाणे चॅट करू शकतील. विशेष म्हणजे, यासाठी त्यांना ना WhatsApp डाउनलोड करावा लागेल ना खाते तयार करावं लागेल.
प्रायव्हसीचा खास विचार
WhatsApp ने यामध्येही एंड-टू-एंड एन्क्रिप्शन ठेवले आहे, म्हणजेच गप्पा पूर्णपणे खाजगी असतील. पाठवणारा आणि प्राप्त करणारा यांनाच मेसेज दिसतील. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे फीचर विश्वासार्ह आणि सुरक्षित ठरेल.
या गेस्ट चॅट फीचरमध्ये काही मर्यादा राहतील:
WhatsApp मागची रणनीती काय?
WhatsApp हे फीचर अशा लोकांसाठी आणत आहे जे अजून पर्यंत अॅप वापरत नाहीत. ही एक लो-फ्रिक्शन एंट्री असू शकते ज्यामुळे नवे यूझर्स अॅप अनुभव घेऊ शकतील आणि भविष्यात पूर्ण अॅप वापरण्यास प्रवृत्त होतील.
हे फीचर कधीपासून वापरता येईल?
आतापर्यंत कंपनीने याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. सध्या हे केवळ इंटरनल बीटा टेस्टिंगमध्ये आहे. मात्र पुढील काही महिन्यांत हे बीटा वापरकर्त्यांना उपलब्ध होऊ शकते आणि नंतर सार्वत्रिक लॉन्च होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, WhatsApp चं हे नवीन फीचर तरुण पिढीसाठी अत्यंत सोयीचं आणि प्रगत असेल, विशेषतः जेव्हा कोणाशी तात्पुरती संवाद साधायचा असेल, त्यासाठी आता अॅपची गरजही नाही!