मच्छर चावतायत.... आता टेंशन दूर होणार! शास्त्रज्ञांनी शोधलं अनोखं तंत्रज्ञान, डासांचा होणार खात्मा! आफ्रिकेत सुरु झाली चाचणी
तुम्ही कधी विचार केला आहे का, एखादा डास आपल्याला चावतो तेव्हा आपल्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. पण अशावेळी डासाला काहीच होत नाही. असं का? अनेकांनी अशी देखील कल्पना केली असेल की एखादा डास आपल्याला चावल्यानंतर आपल्याला आजार होण्यापेक्षा डासाला काही झालं, त्याचा मृत्यू झाला तर किती बरं होईल ना! आता अनेकांची हीच कल्पना सत्यात उतरवण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न सुरु केले आहेत. शास्त्रज्ञांनी असं एक अनोखं तंत्रज्ञान शोधलं आहे, ज्यामुळे आता डासांचा खात्मा होणार आहे. आहे निर्णयाचं कारण?
iPhone युजर्स लक्ष द्या! 30 सप्टेंबरनंतर नाही होणार कॉल रिकॉर्डिंग, Truecaller ने केली घोषणा; काय
शास्त्रज्ञांनी एक अशी गोळी तयार केली आहे, जी खाल्ली तर तर मानवाचे रक्त मच्छर आणि डासांसाठी विष बनणार आहे. अफ्रीकेच्या केन्या आणि मोजाम्बिक या देशात गोळीची चाचणी सुरु करण्यात आली आहे. आईवरमेक्टिन (Ivermectin) असं या गोळीचं नाव आहे. ही गोळी खाल्ल्याने केन्या आणि मोजाम्बिकमध्ये मलेरियाच्या घटना 26 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. हे औषध मानवांना हानी पोहोचवत नाही, परंतु जेव्हा डास चावतात तेव्हा ते स्वतःच मरतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
बोहेमिया नावाच्या सर्वात मोठ्या अभ्यासात, असं आढळलं आहे की, शास्त्रज्ञांनी जेव्हा संपूर्ण समुदायाला हे औषध दिले तेव्हा मलेरियाच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. हा अभ्यास बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ (ISGlobal) ने ला कैक्सा फाउंडेशन, मॅनहिका हेल्थ रिसर्च सेंटर (CISM) आणि KEMRI-वेलकम ट्रस्ट सारख्या संस्थांच्या सहकार्याने केला. अभ्यासाचे निकाल प्रतिष्ठित द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाले आहेत.
2023 साली जगभरात 263 मिलियन मलेरियाचे रुग्ण आढळले. यातील 5.97 लाख रुग्णांचा मृत्यू झाला. मच्छरदाणी (LLIN) आणि घरातील फवारण्या (IRS) सारखे पारंपारिक उपाय आता पूर्वीसारखे प्रभावी राहिलेले नाहीत. त्यामुळे डासांचा खात्मा करण्यासाठी काही ठोसं पाऊलं उचलणं अत्यंत गरेजंच आहे. यासाठीच शास्त्रज्ञांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे.
आयव्हरमेक्टिन हे सामान्यतः रिव्हर ब्लाइंडनेस आणि एलिफॅन्टियासिस सारख्या दुर्लक्षित आजारांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तिला हे औषध दिले जाते, तेव्हा त्या व्यक्तिचे रक्त डासांसाठी विष बनते. म्हणजेच ज्या व्यक्तिला हे औषध देण्यात आले आहे, त्या व्यक्तिला डास चावल्यास त्या डासाचा मृत्यू होणार आहे. या औषधाचा मासिक डोस अनेक दिवसांपर्यंत प्रभावी राहतो. या औषधाची चाचणी केन्या देशातील क्वाले काउंटी आणि मोजाम्बिक देशातील मोपिया या जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.
औषधानंतर मलेरियाच्या घटना किती कमी झाल्या?
26 टक्के
आफ्रिकेतील कोणत्या देशात आईवरमेक्टिन औषधाची चाचणी सुरु झाली?
केन्या आणि मोजाम्बिक
शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या गोळीचं नाव काय आहे?
आईवरमेक्टिन