
200MP कॅमेऱ्यासह Honor 600 सिरीज लाँच! DSLR ला टक्कर देणारे फीचर्स आणि दमदार बॅटरीची साथ करणार धमाका, जाणून घ्या किंमत
हॉनर 600 प्रो स्मार्टफोनचे 12GB+512GB व्हेरिअंट SAR 2,999 म्हणजेच सुमारे 75,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. तर सीरीजमधील नॉन प्रो हॉनर 600 मॉडेलच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत SAR 1,799 म्हणजेच सुमारे 45,000 रुपये आहे. तसेच सिरीजमधील सर्वात महागडे मॉडेल 12GB + 256GB व्हेरिअंट असून त्याची किंमत SAR 1,999 म्हणजेच सुमारे 50,000 रुपये आहे. हॉनर 600 प्रो आणि हॉनर 600 हे दोन्ही डिव्हाईस ब्लॅक, गोल्डन व्हाइट आणि ऑरेंज रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Honor)
हॉनर 600 प्रो आणि हॉनर 600 या दोन्ही लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 6.57-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या दोन्ही डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट देण्यात आले आहे. डिव्हाईसमध्ये 8,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये IP68 + IP69 + IP69K रेटिंग दिली आहे. हे डुअल-सिम हँडसेट अँड्रॉईड 16-बेस्ड मॅजिकओएस 10 वर आधारित आहे.
प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर, हॉनर 600 प्रोमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 इलीट चिपसेट दिला आहे. ज्यासोबत डिव्हाईसमध्ये अॅड्रेनो 830 जीपीयू, 12 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेज दिले आहे. तर हॉनर 600 मध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेट दिले आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये अॅड्रेनो 722 जीपीयू, 12GB जीबीपर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज दिले आहे.
हॉनर 600 प्रोमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 200-मेगापिक्सेल (f/1.9) चा प्रायमरी कॅमेरा आहे. हा एक 1/1.4-इंच सेंसर आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन देखील मिळणार आहे. यासोबतच फोनमध्ये एक 50-मेगापिक्सेल (f/2.8) पेरिस्कोप टेलीफोटो लेंस देखील दिली आहे. याच्या मदतीने तुम्ही 120x पर्यंत डिजिटल आणि 3.5x पर्यंत ऑप्टिकल जूम करू शकता. डिव्हाईसमध्ये एक 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस देखील देण्यात आली आहे. नॉन प्रो मॉडेल हॉनर 600 मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला आहे. यामध्ये प्रो मॉडेल प्रमाणेच प्रायमरी आणि अल्ट्रा-वाइड लेंस दिले आहे. मात्र यामध्ये टेलीफोटो लेंस दिली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
बँक खात्यांची सुरक्षा धोक्यात? निर्मला सीतारमण यांनी दिला इशारा, AI मुळे वाढली चिंता
कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही डिव्हाईसमध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W वायर्ड रिवर्स फास्ट चार्जिंगसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.