उपनगरीय रेल्वे मार्गाला गती मिळणार (फोटो- istockphoto)
तिसरी व चौथी मार्गिका उभारण्यासाठी अर्थसंकल्पात ५१०० कोटी मंजूर
पुणे ते लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गाला गती
पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास गतिमान होणार
पुणे: पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवेतील सुधारणा करण्यासाठी तसेच तिसरी व चौथी मार्गिका उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ५१०० कोटी मंजूर केली आहे.यामुळे पुणे-लोणावळा मार्गाला गती मिळणार असून, पुणे ते लोणावळा दरम्यान प्रवास गतिमान होणार आहे.
पुणे-लोणावळा लोहमार्ग ६३.८७ किलोमीटर लांबीचा असून या मार्गात १७ स्थानकांचा समावेश आहे.या प्रकल्पाचा एकूण खर्च ५०९६.४९ कोटी (५१०० कोटी) रुपये इतका आहे. पुणे-लोणावळा मार्गावरील वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण लक्षात घेता तिसरी व चौथी मार्गिका उभारणीमुळे उपनगरीय सेवेची क्षमता वाढणार असून प्रवाशांना अधिक जलद व सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र, आता राज्यशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यामुळे या प्रकल्पाच्या प्रशासकीय कामकाजास गती मिळून प्रत्यक्ष काम लवकरात-लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार
रेल्वेमध्ये ‘लोको पायलट’ बनायचंय?
लाखो प्रवासी दररोज भारतीय रेल्वेने प्रवास करतात आणि या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर सुरक्षितपणे पोहोचवण्याची अत्यंत महत्त्वाची आणि कठीण जबाबदारी लोको पायलटवर असते. ज्यांना आपण सामान्यतः ट्रेन ड्रायव्हर्स म्हणून ओळखतो. त्यांच्या जबाबदाऱ्या केवळ इंजिन चालवण्यापुरत्या मर्यादित नसून त्या अत्यंत व्यापक आहेत. लोको पायलटना प्रवासादरम्यान प्रत्येक सिग्नलचे बारकाईने निरीक्षण करावे लागते, ट्रॅकची परिस्थिती तपासावी लागते आणि रेल्वेच्या कडक सुरक्षा नियमांचे पालन करावे लागते. खराब हवामान असो वा तांत्रिक बिघाड, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना वेळेचे अचूक नियोजन करावे लागते. ही जबाबदारी अत्यंत एकाग्रतेची असल्याने समाजातील अनेक तरुणांना लोको पायलटचे नक्की उत्पन्न किती असते आणि त्यांना सरकारकडून कोणत्या सोयी-सुविधा मिळतात, याबाबत नेहमीच कुतूहल असते.
रेल्वेमध्ये ‘लोको पायलट’ बनायचंय? जाणून घ्या महिना किती कमावतात आणि कोणत्या मिळतात सुविधा ?
रेल्वेची नोकरी सामान्यतः असिस्टंट लोको पायलटच्या पदापासून सुरू होते. सातव्या वेतन आयोगानुसार, असिस्टंट लोको पायलटचा सुरुवातीचा मूळ पगार अंदाजे 19900 रुपये प्रति महिना असतो. अनुभव आणि पदोन्नती मिळाल्यानंतर, जेव्हा कर्मचारी वरिष्ठ लोको पायलट बनतात, तेव्हा त्यांचा मूळ पगार 35000 वरून 60000 किंवा त्याहून अधिक होतो. बेसिक पगाराव्यतिरिक्त, विविध भत्ते जोडले जातात, ज्यामुळे एकूण इनहँड पगार अंदाजे 40000 ते 80000 प्रति महिना मिळतो.






