तुम्ही जर जिओ युजर्स असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची ठरू शकते. जिओ युजर्सची एक चूक त्यांना महागात पडू शकते आणि त्यांची कॉल हिस्ट्री एखाद्याच्या हातात जाऊ शकतो. रिलायन्स जिओचे भारतात 45 कोटींहून अधिक ॲक्टिव्ह युजर आहेत. अशा परिस्थितीत याचा लाखो वापरकर्त्यांवर परिणाम होऊ शकतो.
जिओ वापरकर्ते त्यांच्या फोनचा रिचार्ज प्लॅन, व्हॅलिडिटी इत्यादी तपासण्यासाठी त्यांच्या फोनवर My Jio ॲप इन्स्टॉल करतात. अशीच एक सुविधा My Jio ॲपमध्ये दिली आहे, जिथे तुमच्या प्रीपेड नंबरवरून केलेल्या सर्व कॉलचा इतिहास दिसतो. तुमची छोटीशी चूक झाली तर ही कॉल हिस्ट्री कोणाच्या तरी हाती लागू शकतो.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

एक चूक पडेल महागात
MyJio ॲपमध्ये तुमच्या नंबरवर ॲक्टिव्ह असलेल्या सर्व सेवांचा तपशील असतो, ज्यामुळे एखाद्याला त्याचा ॲक्सेस मिळणे धोकादायक ठरू शकते. MyJio ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी युजरचा मोबाइल नंबर आवश्यक आहे. यानंतर, नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल, जो एंटर केल्यानंतर तुम्हाला या ॲपमध्ये प्रवेश मिळेल. जर चुकून, एखाद्याने MyJio ॲपवर लॉग इन करण्यासाठी तुमचा Jio नंबर वापरला असेल आणि चुकून त्याला OTP आला तर तुमचे सर्व रहस्य उघड होऊ शकते. तुम्ही कोणत्या नंबरवर कॉल केला, किती वेळा आणि किती वेळ केला अशी सर्व तपशील उघड होतील.
इतकेच नाही तर कोणीतरी तुमच्या नंबरवर ॲक्टिव्ह इंटरनेट डेटा पॅक आणि इतर वॅल्यु एडेड सर्व्हिसेसची माहिती देखील मिळवू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही चुकूनही तुमचा OTP कुणालाही शेअर करू नये. MyJio ॲपमध्ये तुम्ही तुमच्या नंबरवरून कॉल आणि मेसेजचा इतिहास देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये MyJio ॲप इंस्टॉल करावे लागेल आणि तुमच्या Jio नंबरने लॉग इन करावे लागेल.
टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा
अशाप्रकारे चेक करा कॉल हिस्ट्री






