Tech Tips: कोण करतंय तुमच्या Wi-Fi चा वापर? या स्टेप्स फॉलो करा अन् 5 मिनिटांत शोधा अनोळखी डिव्हाईस
कमकुवत पासवर्ड, जुन्या राऊटरची सुरक्षा सेटिंग्स किंवा कोणासोबत वायफाय पासवर्ड शेअर केल्यास कोणतीही व्यक्ती अगदी सहज तुमच्या वायफायचा वापर करू शकतात. यामुळे केवळ इंटरनेट स्पीडवरच नाही तर तुमची वैयक्तिक माहिती देखील धोक्यात येऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
अचानक इंटरनेट स्पीड कमी होणं, व्हिडीओ वारंवार बफर होणं किंवा डेटा सामान्य वेळेपेक्षा लवकर संपणं, या संकेतांमुळे समजतं की तुमच्या वायफायचा वापर दुसरं कोणी करत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही अनोळखी व्यक्ती तुमच्या नेटवर्क संबंधित ऑनलाइन अॅक्टिविटीवर नजर ठेऊ शकतात. सायबरसुरक्षा तज्ञांच्या मते, राउटर्स आणि स्मार्ट IoT उपकरणांमधील असुरक्षितता सातत्याने वाढत आहे, ज्यामुळे हा धोका आणखी गंभीर होत आहे.
कसं शोधाल वायफाय कोणत्या डिव्हाईसला कनेक्ट आहे?
तुमच्या वायफाय नेटवर्कला कोणते डिव्हाईस जोडले आहेत, हे शोधण्यासाठी तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता.
राऊटर अॅडमिन पॅनलमध्ये लॉगिन करा.
कोणत्याही कनेक्टेड डिव्हाईशवर ब्राऊझर ओपन करा आणि अॅड्रेस बारमध्ये राऊटरचा आयी अॅड्रेस एंटर करा. सहसा हा अॅड्रेस 192.168.1.1, 10.0.0.1 असू शकतो.
अॅडमिन यूजरनेम आणि पासवर्ड एंंटर करा
राऊटरच्या मागे असलेल्या स्टिकर किंवा इंटरनेट सर्विस प्रोवाइडरद्वारे दिलेल्या लॉगिन डिटेल्सचा वापर करा.
लॉगिन केल्यानंतर तुम्हाला खालील पर्याय दिसतील.
यादीमध्ये असलेल्या डिव्हाईसची तुलना तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही, स्मार्ट स्पीकर आणि इतर गॅझेट्सची करा. जर या यादीमध्ये कोणतेही अनोळखी डिव्हाईस असेल तर ही चिंतेची गोष्ट असू शकते.
जर तुम्हाला कोणतेही अनोळखी किंवा संशयास्पद डिव्हाईस दिसले तर सर्वात आधी तुमच्या वायफायचा पासवर्ड बदला. यासोबतच राऊटरच्या सुरक्षा सेटिंगमध्ये जाऊन WPA3 एन्क्रिप्शन एक्टिव करा. हे एक अधिक आधुनिक आणि सुरक्षित वायरलेस सुरक्षा मानक मानले जाते, जे अनधिकृत प्रवेश रोखण्यास मदत करते.






