Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या
WhatsApp हा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आजच्या काळात प्रत्येकाची गरज बनला आहे. WhatsApp केवळ एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसून डिजिटल हब आहे. WhatsApp वर तुम्ही तुमचे फोटो, व्हिडीओ, बँक डिटेल्स सर्व काही सेव्ह ठेवता. WhatsApp वर तुमच्या अनेक वैयक्तिक गोष्टी तुम्ही इतरांसोबत शेअर करत असतात. अशावेळी जर तुमच्या WhatsApp ची सिक्योरिटी कमजोर असेल तर तुमचा सर्व डेटा हॅकर्सच्या हाती जाऊ शकतो आणि तुमचा हा डेटा लीक होण्याची किंवा त्याचा चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता वाढते.
अशा परिस्थितीत WhatsApp ची सिक्योरिटी अधिक मजबूत ठेवावी आणि तुमचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. तुम्ही केवळ 60 सेंकदांत तुमचा WhatsApp डेटा सुरक्षित ठेऊ शकता. यासाठी तुम्हाला केवळ 5 महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे टू-स्टेप वेरिफिकेशन ऑन करा. यासाठी तुम्हाला सर्वात आधी WhatsApp च्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी ओपन करावी लागेल आणि त्यानंतर टू-स्टेप वेरिफिकेशन चालू करावे लागणार आहे. इथे 6 डिजीट पिन सेट करा. जर कोणी दुसरा तुमच्या नंबरवरून WhatsApp चालू करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला हा पिन टाकावा लागणार आहे.
तुमचे चॅट्स सुरक्षित ठेवण्यासाठी फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस अनलॉक ऑप्शन करा. यासाठी WhatsApp च्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी ओपन करावी लागेल आणि त्यानंतर फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस अनलॉक चालू करा. आता तुम्ही स्वतःला ऑथेंटिकेट केल्यावरच तुमचे WhatsApp उघडेल.
अनेकदा स्कॅमर्स प्रोफाईल फोटो आणि स्टेटसवरून तुमची माहिती मिळवतात. हे सर्व थांबवण्यासाठी WhatsApp च्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी ओपन करावी लागेल आणि त्यानंतर प्रोफाइल फोटो / लास्ट सीन / अबाऊट वर क्लिक करा आणि माय कॉन्टॅक्ट्स ओन्ली हा पर्याय निवडा. त्यामुळे तुमची माहिती केवळ तुमच्या संपर्कांना दिसणार आहे.
कोणतीही अज्ञात लिंक किंवा मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी लक्ष द्या. अशा लिंक सहसा युजर्सचा डेटा चोरण्यासाठी तयार केलेल्या असतात. WhatsApp आता अशा लिंक्ससाठी “संशयास्पद लिंक डिटेक्शन” फीचर देखील देत आहे, जे तुम्हाला आगाऊ चेतावणी देईल.
गुगल ड्राईव्ह किंवा आयक्लाऊट मध्ये चॅट्स सुरक्षित ठेवा. सेटिंग्जमध्ये जा, नंतर चॅट्स ओपन करा. आता चॅट बॅकअपवर क्लिक करा आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप सक्षम करा वर जा. तुमच्या बॅकअप फाइल्स आता पासवर्ड संरक्षित असतील.
Ans: WhatsApp हे एक मोफत मेसेजिंग अॅप आहे ज्याद्वारे चॅट, कॉल, व्हिडिओ कॉल, फोटो/व्हिडिओ शेअरिंग आणि ग्रुप चॅट करता येतात.
Ans: या फीचरमुळे तुमचे मेसेज, कॉल आणि मीडिया सुरक्षितपणे फक्त तुम्ही आणि रिसिव्हरच पाहू शकतात.
Ans: WhatsApp वर स्टेटस 24 तासांसाठी उपलब्ध असतो.






