कसे काम करते WhatsApp चे Passkey फीचर? OTP पेक्षा चांगले की वाईट? जाणून घ्या सविस्तर
ओटीपी असा एक कोड असतो जो एसएमएसद्वारे तुमच्या फोनवर पाठवला जातो. हे ओटीपी यूजर्स मॅन्युअली त्यांच्या अॅपमध्ये एंटर करतात. यामुळे व्हॉट्सअॅप लॉगिन करण्याची प्रोसेस अधिक स्मूद आणि जलद होते. एसएमएसद्वारे पाठवला जाणारा हा कोड एका मर्यादित वेळेपर्यंत उपलब्ध असतो. यानंतर हा कोड एक्सपायर होतो. मात्र पासकीमध्ये कोणताही कोड वापरला जात नाही. या फीचरमध्ये केवळ फिंगरप्रिंट, फेस अनलॉक किंवा पिनचा वापर केला जातो. यानंतर तुम्ही थेट तुमच्या व्हॉट्सअॅपध्ये लॉगिन करू शकता. ही प्रोसेस ओटीपीपेक्षा अधिक जास्त सोपी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झाले तर पासकी फीचर ओटीपीपेक्षा जास्त सुरक्षित मानले जाते. फिशिंग किंवा सिम स्वॅप सारख्या पद्धतींचा वापर करून कधी कधी ओटीपी हॅक केला जाऊ शकतो. मात्र पासकीमध्ये तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स (जसे फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक) चा वापर केला जातो. हे डिटेल्स कॉपी करणं किंवा चोरी करणं कठीण असतं.
लाँच होताच गायब झाला Nothing चा Warp अॅप! यूजर्सना बसला धक्का, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
ओटीपी आणि पासकी या दोन्हीमध्ये कोण जास्त सुरक्षित आणि चांगले आहे, असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा अनेक लोकं फोनच्या पासकी फीचरला सपोर्ट करते. पासकी फीचर ओटीपीपेक्षा नेहमीच चांगले मानले जाते. ही एक सुरक्षित पद्धत देखील आहे. कधी कधी ओटीपीचा एसएमएस येण्यासाठी काही वेळ लागू शकतो. मात्र पासकीच्या बाबतीत असं होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. ओटीपी हे देखील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असले तरी, त्याचा वापर नवीन डिव्हाइस घेताना किंवा तुमच्या व्हॉट्सॲपचा बॅकअप घेताना केला जातो. पासकी वेळ वाचवते आणि यूजरचा अनुभव सुधारते.






