Google Map Update: अशा पद्धतीने गुगल मॅपमध्ये मिळणार वेदर अपडेट, एयर क्वालिटी इंडेक्सचीही माहिती मिळणार
करोडो लोक रस्ता शोधण्यासाठी नेव्हिगेशन अॅप गुगल मॅपचा वापर करतात. गुगल मॅपच्या मदतीने अवघड वाट शोधणे देखील अगदी सहज सोपं होतं. गुगल मॅप आता केवळ रस्ता शोधण्यासाठीच नाही तर हवामान अपडेट देण्यासाठी देखील मदत करणार आहे. गुगल मॅप्सवर असं फीचर जोडण्यात आलं आहे ज्याच्या मदतीने युजर्सना आता कोणत्याही ठिकाणचे हवामान अपडेट्स अगदी सहज मिळणार आहे. गुगल मॅप्सवर हवामान अपडेट मिळवण्यासाठी युजर्सना काही सोप्या स्टेप्स फॉलो करून सेटिंग अपडेट करावी लागणार आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: स्पीड चलानपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगल मॅप करेल मदत, फक्त करा ही सेटिंग
गुगल मॅपमधील हवामान अपडेटचे हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्हाला रिअल टाईम इंडेक्स आणि हवामानाची सर्व माहिती मिळू शकते.पण यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरील गुगल मॅपमध्ये काही सेटिंग करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- Google Map Update: iPhone वर गुगल मॅपला डिफॉल्ट नेविगेशन अॅप बनवायचं? या सोप्या टीप्स तुम्हाला करतील मदत