India Pakistan War: X ची भारतात मोठी कारवाई, तब्बल 8,000 अकाऊंट्स केले ब्लॉक! स्वत: सरकारने दिले होते आदेश
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंपैकी एक असलेल्या एलन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने मोठी कारवाई केली आहे. एक्सने तब्बल 8 हजार अकाऊंट्स बॅन केले आहेत. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान चुकीची माहिती शेअर करणाऱ्या, लोकांना भडकवणाऱ्या पोस्ट शेअर करणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या एक्स अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली आहे. भारत सरकारने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.
एलन मस्कच्या मालकिच्या एक्सने सांगितलं आहे की, सरकारने त्यांना 8,000 हून अधिक अकाउंट्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने दिलेल्या या आदेशांनतर खोट्या पोस्ट शेअर करणाऱ्या अकाऊंट्सवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. सरकारने म्हटलं आहे की, सरकारने जारी केलेल्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही तर एक्सच्या भारतातील कर्मचाऱ्यांना दंड आणि तुरुंगवासाचा सामना करावा लागू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
सरकारने दिलेल्या आदेशानुसार, एक्सने भारतात चुकीची माहिती पसरवणारे 8,000 हून अधिक अकाउंट्स ब्लॉक केले आहेत. यानंतर एक्सने सांगितलं आहे की, कंपनी भारतात सेवा सुरु ठेवण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करत आहे. परंतु या निर्देशांमध्ये पारदर्शकतेची कमी आहे. कंपनीने म्हटलं आहे की, अधिक आदेशांमध्ये हे स्पष्टच करण्यात आले नाही की, कंटेटने कोणत्या भारतीय कायद्यांचे उल्लंघण केले आहे, ज्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अनेक प्रकरणांमध्ये ब्लॉक करण्यात आलेल्या अकाऊंट्सवर का कारवाई करण्यात आली आहे, याची योग्य कारण नाही.
X has received executive orders from the Indian government requiring X to block over 8,000 accounts in India, subject to potential penalties including significant fines and imprisonment of the company’s local employees. The orders include demands to block access in India to…
— Global Government Affairs (@GlobalAffairs) May 8, 2025
एक्सने म्हटलं आहे की, ज्या युजर्सचं अकाऊंट्स ब्लॉक करण्यात आलं आहे, त्यांना संबंधित माहिती देण्यात आली आहे आणि त्यांना कायद्याची मदत घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी, कंपनीने आयप्रोबोनो इंडियासह इतर कायदेशीर मदत संस्थांची माहिती देखील शेअर केली आहे. एक्सने पुढे म्हटले आहे की ते भारतीय कायद्यांतर्गत त्यांच्या मर्यादित कायदेशीर पर्यायांचा आढावा घेत आहेत, परंतु एक्सला स्वतः या आदेशांना न्यायालयात आव्हान देण्याचे स्वातंत्र्य नाही.
मेटा-मालकीच्या इंस्टाग्रामने भारतातील लोकप्रिय मुस्लिम न्यूज पेज ‘मुस्लिम’ ब्लॉक केले आहे. या पेजचे 6.7 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ते मुस्लिम समुदायाशी संबंधित जागतिक बातम्या आणि मुद्दे शेअर करते. जेव्हा भारतातील इंस्टाग्राम युजर्स या पेजवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना “भारतात खाते उपलब्ध नाही. कारण आम्ही हा कंटेट प्रतिबंधित करण्याच्या कायदेशीर विनंतीचे पालन केले आहे”, असा मेसेज दिसत आहे. म्हणजेच, भारत सरकारच्या कायदेशीर मागणीवरून मेटाने या कंटेंटवर बंदी घातली आहे.