फोटो सौजन्य: Gemini
भारतात iPhone ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. खासकरून तरुणांमध्ये तर आयफोन खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड पाहायला मिळते. तसेच आजच्या काळात आयफोन असणे हे प्रतिष्ठेचे चिन्ह मानले जाते. ज्यामुळे कित्येक जण बजेट नसताना सुद्धा आयफोन खरेदी करत असतात. मात्र, जर तुमचा बजेट असेल आणि एका चांगल्या आयफोन मॉडेलच्या शोधात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
जरी दिवाळीचा सण संपला असला तरी कंपन्यांकडून मोठ्या डिस्काउंटचा सिझन सुरूच आहे. तुम्ही या डिस्काउंटच्या सिझनचा फायदा घेऊ शकता आणि परवडणाऱ्या किमतीत iPhone 16 मिळवू शकता. गेल्या वर्षी लाँच झालेल्या या मॉडेलमध्ये अनेक पॉवरफुल फीचर्स आहेत. त्यात आता हा फोन 23000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा फोन अपग्रेड करू इच्छित असाल किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला आयफोन भेट देऊ इच्छित असाल, तर ही एक उत्तम संधी आहे.
Vodafone Idea ने ‘या’ शहरात सुरू केली CNAP सेवा; आता येणार नाहीत बोगस कॉल्स
ॲपलने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा फोन लाँच केला होता. यात HDR कंटेंटला सपोर्ट असलेला 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आणि 2,000 निट्सचा पीक ब्राइटनेस आहे. हा फोन A18 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो मल्टीटास्किंग आणि ॲपल इंटेलिजेंस फीचर्स सहजतेने हाताळतो. हाय परफॉर्मन्ससोबतच, हा प्रोसेसर कार्यक्षम आणि आगामी सॉफ्टवेअर अपडेट्सशी सुसंगत आहे.
iPhone 16 च्या रिअर पॅनलवर 48MP चा Fusion Camera आणि 12MP चा Macro Camera देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 12MP चा कॅमेरा दिला आहे. बॅटरीबाबत बोलायचं झालं, तर Apple चं म्हणणं आहे की फुल चार्जिंगनंतर हा iPhone तब्बल 22 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी 79,900 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता.
अल्पवयीन मुलं रोमान्ससाठी वापरतात AI! सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
Vijay Sales मध्ये सध्या हा iPhone जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या फोनची किंमत 13,000 रुपयांपेक्षा जास्त सूटीनंतर 66,490 रुपयांइतकी ठेवण्यात आली आहे. याशिवाय, ग्राहकांना IDFC First Bank Credit Card द्वारे EMI Transaction करताना आणखी 10,000 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त सूट मिळू शकते. म्हणजे एकूण मिळून या iPhone वर तब्बल 23,410 पर्यंतचा फायदा मिळणार आहे. त्यासोबतच, ग्राहक त्यांचा जुना फोन देऊन Exchange Bonus चाही लाभ घेऊ शकतात.






