मोबाईल कंपन्यांमध्ये आयफोनचे नाव उच्च स्तरावर आहे. आयफोन एक उत्तम टेक कंपनी असून ती नेहमीच युजर्ससाठी नवीनतम फीचर्स घेऊन येत असते. ऍपलमी आपल्या वार्षिक वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये iOS 18 ला अनेक नवनवीन फीचर्ससह लाँच केलेलं आहे. नवीन अपडेट्स हे आतापर्यंतचे सर्वात मोठे OS अपडेट असल्याचे सांगण्यात येत आहे. आता iOS 18 ,मध्ये थर्ड पार्टी ऍप्स आणि नॉन ऍपल ऍप्ससाठी कंट्रोल ऍक्सेसचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन iOS 18 आयफोनला अधिक पर्सनल, कॅपेबल आणि इंटेलिजंट बनवेल. या नवीन iOS 18 मध्ये आता यूजर्ससाठी अनेक काही फीचर्स उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला याच फीचर्सविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहोत.
iOS 18 फीचर्स
[read_also content=”इन्स्टाग्रामचं नवीन फिचर लाँच! आता रिल्स बघताना थांबावच लागणार, काय आहे यात ? वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/technology/instagrams-new-ad-break-feature-launched-now-users-cant-scroll-post-without-ad-546018.html”]
कंट्रोल सेंटरवर अधिक कंट्रोल करता येईल
नवीन OS मध्ये आता यूजर्सना पूर्वीपेक्षा अधिक कंट्रोल करता येणार आहे. आता फोनमधील ऐअरप्लेन मोड, ब्राइटनेस, व्हॉल्युम अशा गोष्टी आता त्वरित आणि झटपट करता येतील. आता कंट्रोल सेंटर फक्त ऍपल ऍप्सच नाही तर इतर तुमचे आवडते थर्ड पार्टी ऍपही कंट्रोल करू शकते. ऍपलचा स्टॉक मेल ऍप तुमच्या मेलची क्रमवारी लावण्यास मदत करेल म्हणजेच याच्या मदतीने मेलचे ऑर्गनाईजेशन करणे सोपे होईल.
आवाज न देता सीरीला कमांड करता येईल
आता नवीन OS अपडेटमध्ये आयफोन यूजर्स आयफोन काहीही न बोलता सिरीला कमांड देऊ शकणार आहेत. यासाठी युजर्स डोके हलवून सिरीला कमांड करू शकतील. याचबरोबर चेहऱ्याच्या इतर जेश्चरच्या मदतीने यूजर्स संपूर्ण फोन कंट्रोल करू शकतील. उदाहरणार्थ, जर युजर्सना एखाद्या कॉलचे उत्तर द्यायचे नसेल, तर ते त्यांचे डोके वर आणि खाली हलवून सिरीला कमांड करू शकतात.
होम स्क्रीन कस्टमायझेशन
आता नवीन फीचर्ससह ऍपल iOS 18 तुम्हाला तुमचा होम स्क्रीन वॉलपेपर, ऍप आयकॉन आणि विजेट्स कस्टमाईज करण्याची सुविधा पुरविणार आहे . हा अपडेट एक नवीन कस्टमायझेशन शीट देखील आणतो. ज्याद्वारे तुम्ही वेगवेगळ्या कलरसह ऍप आयकॉनला कलर देऊ शकता. त्यात डार्क मोड देखील देण्यात आला आहे. याशिवाय युजर्स वॉलपेपर, आयकॉन आणि विजेट्समध्येही त्यांना हवे तसे बदल करू शकणार आहेत.