2023 मध्ये लाँच झालेला सॅमसंग गॅलॅक्सि S23 अल्ट्रा 5G (Samsung Galaxy S23 Ultra 5G) स्मार्टफोन आता खूपच स्वस्त किमतीत उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत आता किंमत लक्षणीयरीत्या कमी करण्यात आली आहे. ही किंमत पाहून आता युजर्स थक्क झाले आहेत तसेच अनेकांना आता आहे स्मार्टफोन खरेदी करण्याचा मोह आवरला जात नाही आहे. आधी त्याची किंमत 1,49,999 रुपये होती, पण आता तुम्ही फक्त 76,999 रुपयांना खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन जुना असला तरी तो ट्रेंडमध्ये कायम आहे कारण त्याचा कॅमेरा आणि बॅटरी अप्रतिम आहे. स्मार्टफोनची डिजाइन देखील लोकांना फार आवडली आहे.
Samsung Galaxy S23 Ultra 5 वर उपलब्ध आहेत ऑफर्स
हा फोन खरेदी केल्यावर तुम्हाला अनेक ऑफर्स मिळतील. तुम्ही बँकेकडून खास डिस्काउंट मिळवू शकता आणि फोन व्याजमुक्त हप्त्यांमध्ये देखील खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्ही तो बदलून 53,200 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या फोनचा हप्ता फक्त 3,733 रुपयांपासून सुरू होतो.
तुमच्या फोनमध्येही हे ॲप्स तर नाहीत? असतील तर ताबडतोब करा डिलीट अन्यथा होईल पश्चाताप
Samsung Galaxy S23 Ultra 5 स्मार्टफोनचे फिचर्स
Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 6.81 इंचाची सुपर AMOLED स्क्रीन आहे जी अतिशय स्मूथ चालते. यात सर्वात वेगवान प्रोसेसर आहे आणि 12GB RAM सह अतिशय जलद काम करतो. यात 200MP मुख्य कॅमेरा आहे जो उत्तम फोटो घेतो. याशिवाय, यात एस-पेन (S-Pen) देखील आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे नोट्स बनवू शकता किंवा काढू शकता. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे जी लवकर चार्ज होते. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे जो 1Hz वर देखील वापरला जाऊ शकतो.
तुमच्या घराच्या छतावर लावा Solar, सरकार देत आहे सबसिडी, ऑनलाईन करा अप्लाय
Galaxy S23 Ultra एकूण चार कलर्समध्ये उपलब्ध होतो ज्यात, फँटम ब्लॅक, ग्रीन, क्रीम आणि लॅव्हेंडर कलरचा समावेश आहे. फोनसोबत मेटल फ्रेम उपलब्ध आहे. बॉडीमध्ये आर्मर ॲल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. सॅमसंगच्या Galaxy S23 Ultra मध्ये 200-megapixel कॅमेरा देखील आहे. Amazon ला भेट देऊन, तुम्ही Samsung Galaxy S23 Ultra 5G (12GB RAM आणि 256GB स्टोरेज) मॉडेल खरेदी करू शकता. कंपनीचा सर्वात मोठा सेन्सर असलेला हा पहिला फोन आहे.