प्रीमियम फीचर्सचा जबरदस्त पॅक! Lava Bold N2 5G च्या एंट्रीने हादरलं मार्केट... किंमत 13 हजारांहून कमी
शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा… या यूजर्सना मिळणार फायदा
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या नव्या फोनमध्ये ऑक्टा-कोर 6nm युनिसॉक T8200 प्रोसेसर आणि 13MP रियर कॅमेऱ्यासह 5MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाईसची किंमत 13 हजार रुपयांहून कमी आहे. त्यामुळे जर तुम्ही कमी किंमतीत एक दमदार पर्याय शोधत असाल तर Lava Bold N2 5G तुमच्यासाठी योग्य आहे. (फोटो सौजन्य – Lava )
लावाने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये आहे. मात्र, लाँच ऑफरचा भाग म्हणून, हा फोन 9 जून रोजी Amazon.in वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. पहिल्या विक्रीवेळी कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही ऑफर्स जाहीर करणार आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहक हा नवा स्मार्टफोन 11,999 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत.
It’s time you upgrade to the most no BS phone ever. The all new Bold N2 5G is here! Special Launch Price: ₹11,999*
Sale Starts: 9th June, 12PM
Notify Me: https://t.co/JIE78HnJgz *Valid only on Day 1#NoBullshit #NoBloatware #LavaMobiles #Amazon pic.twitter.com/JjQUpGrnRX — Lava Mobiles (@LavaMobile) June 3, 2026
रीगल गोल्ड आणि बिलियनेअर ब्लू अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनी आपल्या विद्यमान ग्राहक सेवा मॉडेलचा भाग म्हणून बोल्ड N2 5G सोबत मोफत ‘सर्व्हिस ॲट होम’ देखील देत आहे. हा प्रोग्राम संपूर्ण भारतातील ग्राहकांना त्यांच्या दारातच विक्रीनंतरचे तांत्रिक सहाय्य पुरवतो. याचा अर्थ, तुम्हाला नियमित देखभाल किंवा समस्या निवारणासाठी सेवा केंद्राला भेट देण्याची गरज भासणार नाही.
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. Lava Bold N2 5G मध्ये 6.75-इंच HD+ नॉच डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यासोबतच फोनमध्ये IP64 रेटिंग देखील मिळणार आहे. ज्यामुळे स्मार्टफोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो.
लेटेस्ट लाँच डिव्हाईस ऑक्टा-कोर 6nm युनिसॉक T8200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे हार्डवेअर सेटअप AnTuTu v11 बेंचमार्कवर 500,000 पेक्षा जास्त स्कोअर मिळवते.
फोटोग्राफी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये एक सरळ असा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट सेंसर मिळणार आहे.
सर्वात विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीच्या डेटानुसार, ही बॅटरी एका चार्जवर सलग 815 मिनिटे यूट्यूब चालवू शकते आणि एकूण 743 मिनिटांपर्यंत स्क्रीन चालू ठेवण्याची क्षमता देते.
Ans: बहुतेक Lava स्मार्टफोनमध्ये जवळपास Stock Android अनुभव मिळतो.
Ans: सामान्य आणि मध्यम स्तरावरील गेमिंगसाठी Lava चे अनेक स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकतात.
Ans: बहुतेक Lava स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी दिली जाते, जी सामान्य वापरात दिवसभर टिकते.






