फोटो सौजन्य -LinkedIn
Meta ने भारतात AI चॅटबोट लाँच केले आहे. हे चॅटबोट वापरकर्त्यांना Facebook, WhatsApp, Instagram आणि Messenger वर वापरता येणार आहे. Meta ने लाँच केले AI चॅटबोट Chat GPT आणि Gemini ला टक्कर देणार असल्याचे सांगितले जात आहे. Facebook, WhatsApp, Instagram आणि Messenger वापरकर्ते विनामुल्य Meta AI चा वापर करू शकतात. हे चॅटबोट meta.ai वर देखील उपलब्ध आहे. Meta ने काही दिवसांपूर्वी AI चॅटबोटची चाचणी केली होती. त्यानंतर आता अखेर हे चॅटबोट भारतात लाँच करण्यात आले आहे.
भारतासह हे चॅटबोट इतर १२ देशांमध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्यामध्ये युनाईटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलँड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, युगांडा आणि झिम्बाब्वे या देशांचा समावेश आहे. या देशानंतर आता Meta AI भारतात देखील लाँच करण्यात आला आहे. Meta AI आतापर्यंतचे सर्वात प्रगत एलएलएम – मेटा लामा ३ (Meta Llama 3) सह डिझाइन करण्यात आले आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टिविषयी माहिती शोधण्यासाठी, टास्क्स पूर्ण करण्यासाठी, Meta AI चा वापर करता येणार आहे. तुम्हाला संगणकावर एखादे टास्क्स पूर्ण करायचे असेल तर meta.ai ला भेट द्या. meta.ai द्वारे तुम्हाला अनेक विषयांवरील सखोल माहिती मिळले. Meta AI भारतात इंग्रजी भाषेमध्ये लाँच करण्यात आले आहे.
तुम्हाला फिरायला जायचे असेल, पण नक्की कोणत्या ठिकाणी जावे, हे समजत नसेल, तर अशावेळी तुम्ही Meta AI ची मदत घेऊ शकता. परीक्षेची तयारी करताना अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी देखील Meta AI तुम्हाला मदत करेल. घरातील फर्निचर आणि सजावटीबद्दल नवीन आयडीया पाहिजे असल्यास Meta AI तुमची मदत करेल. ईमेल तयार करणे, कविता लिहीणे, टेक्स्ट समराईज करणे, विविध मुद्द्यांचे भाषांतर करणे यासांरख्या अनेक कामांसाठी तुम्ही Meta AI ची मदत घेऊ शकता. Meta AI च्या मदतीने चॅट विंडोमध्ये फोटो आणि GIF देखील तयार करता येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कोणत्या गोष्टीविषयी माहिती शोधण्यासाठी किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी दुसऱ्या अॅपवर जाण्याची गरज नाही. तुम्ही Facebook, WhatsApp, Instagram आणि Messenger वरच Meta AI च्या मदतीने तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकता.