Delhi News: हरदीपसिंग पुरींच्या मुलीचे नाव अमेरिकेतील 'अनक्लेम्ड प्रॉपर्टी' यादीत; नेमकं काय आहे प्रकरण?
Free Fire MAX: प्लेअर्ससाठी खुशखबर! बंडल आणि स्किनसह मोफत रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी… हे आहेत
२०१४ मध्ये या कंपनीला सुमारे २८ कोटी डॉलर्स (साधारण २,४०० कोटी रुपये) गुंतवणूक मिळाली आणि २०१४-१५ – दरम्यान एकूण फंडिंग ५,७०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, हरदीप पुरी यांनी एप्स्टीनशी कोणत्याही वैयक्तिक संबंधांचा इन्कार केला असला, तरी एका ईमेलमध्ये हरदीप पुरी आपली मुलगी हिमायनीच्या वतीने एस्टीनचे आभार मानत असल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकेतील वित्तीय संस्था वेळोवेळी अशा खात्यांची किंवा मालमत्तेची यादी जाहीर करतात, ज्यावर दीर्घकाळ कोणीही दावा केलेला नाही. २०२२ च्या नोटीसमध्ये हिमायनी पुरी यांचे नाव आल्यानंतर ही मालमत्ता नक्की काय आहे… नगद, विमा रक्कम, गुंतवणूक किंवा इतर काही, असा प्रश्न उपस्थित झाला. विशेष म्हणजे, २०२३, २०२४ आणि २०२५ च्या नोटीसमध्येही त्यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर या प्रकरणाचा संबंध अमेरिकन गुन्हेगार जोफ्री एप्स्टीनशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. ही मालमत्ता अशा नेटवर्कशी संबंधित आहे का, ज्यामुळे त्यावर दावा केला जात नाहीये? असे सवाल विचारले जात आहेत. तथापि, या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मंत्री पुरी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले की, एफटीनच्या कोणत्याही गुन्हेगारी कृत्याशी त्यांचा संबंध नाही आणि ते त्याला केवळ व्यावसायिक कारणांमुळे काही प्रसंगी भेटले होते.
जरा इन दस्तावेजों को ध्यान से देखिए.. इस सबके बाद तो हरदीप सिंह पुरी इस्तीफ़ा देना ही चाहिए। बाप एप्स्टीन को डिजिटल इंडिया समझा रहा था और बेटी एपस्टीन के आदमी के माध्यम से करोड़ों का फंड ले रही थी.. तो क्या हरदीप सिंह पुरी की बेटी एपस्टीन के करीबी रहे रॉबर्ट मिलर्ड की बिज़नेस… pic.twitter.com/cEOb7pPSEQ — Kunal Shukla (@kunal492001) February 21, 2026
अमेरिकन सरकारच्या सार्वजनिक नोंदींनुसार, एका विशिष्ट मालमत्तेच्या संदर्भात हरदीप सिंह पुरी यांचे नाव सातत्याने समोर येत आहे. “२०२२ पासून सुरू झालेला हा प्रकार २०२३, २०२४ आणि २०२५ च्या सरकारी नोटिसांमध्येही कायम असल्याचे दिसून आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फेब्रुवारी २०२६ पर्यंत या कथित मालमत्तेवर कोणीही अधिकृतपणे मालकी हक्क सांगितलेला नाही.
Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी
सोशल मीडियावर काही नेत्यांनी आणि युजर्सनी या मालमत्तेचा संबंध जेफ्री एपस्टाईनच्या नेटवर्कशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. उपस्थित केले जाणारे मुख्य प्रश्न खालीलप्रमाणे आहेत. दावा का केला जात नाही? ही मालमत्ता अशा एखाद्या वादग्रस्त नेटवर्कशी जोडलेली आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एपस्टाईनच्या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय संबंध पाहता, भारतीय नेत्याचे नाव तिथे असणे हे केवळ योगायोग आहे की आणखी काही, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अमेरिकेत अशा नोटीस येणे ही एक सामान्य कायदेशीर प्रक्रिया असू शकते. अनेकदा पत्ता बदलल्यामुळे किंवा विसरल्यामुळे छोटे लाभांश (Dividends), सुरक्षा अनामत रक्कम (Security Deposits) किंवा परताव्याचे धनादेश (Refund Checks) सरकारी तिजोरीत जमा होतात. जोपर्यंत मूळ मालक त्यावर दावा करत नाही, तोपर्यंत ती माहिती सार्वजनिक केली जाते.






