ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढीने आयटी कंपन्यांमध्ये गोंधळ; मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन कर्मचाऱ्यांना दिला आणाबाणीचा संदेश
H-1B Visa Programme : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकतेच H-1B व्हिसाच्या शुल्कात वाढ केली आहे. तसेच या व्हिसाच्या नियमांमध्येही बदल केला आहे. मात्र यामुळे मायक्रोसॉफ्ट (Microsoft), ॲमेझॉन यांसारख्या कंपन्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलर्स पर्यंत म्हणजे भारतीय रुपयांमध्ये ८.८ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढ केली आहे. याचा थेट परिणाम भारतीयांवर होणार आहे.
मात्र यामुळे अमेरिकेतील टेक कंपन्यांमध्ये गोंधळ उडाला असून आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकन कर्मचाऱ्यांना कंपनी न सोडण्याचे आवाहन केले आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांना अंतर्गत इ-मेल पाठवले आहे. यामध्ये अमेरिकेबाहेर असलेल्या H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आणि नोकरी न सोडण्याचे आवाहन केले आहे.
भारतीयांना धक्का! H1B व्हिसावर अमेरिकेने लागू केले १ लाख डॉलर शुल्क; जाणून घ्या काय होणार परिणाम?
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, मॉयक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये सांगितले आहे की, H-1B आणि H-4 व्हिसा धारकांना २० सप्टेंबरपर्यंत कामावर परतण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जेपी मॉर्गन चेसनेही H-1B धारक कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत अमेरिकेतच राहण्याचा आणि आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी H1-B व्हिसा शुल्कात वाढ केली आहे. याचा उद्देश H1-B व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांना रोखणे आणि देशातील नागरिकांसाठी नोकऱ्या उपलब्ध करुन देणे आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की, मोठ्या टेक कंपन्या H1-B व्हिसा धारकांना कमी पगारात कामावर ठेवत आहेत. पण आता शुल्कात वाढ केल्यामुळे या व्हिसाचा गैरवापर बंद होईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे मोठ्या उद्योग कंपन्या Amazon,Microsoft आणि JPMorgan Chase या सर्व कंपन्यांनी H1-B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना अमेरिकत राहण्याचा सल्ला दिला आहे. फेसबुकची कंपनी मेटाने देखील असाच संदेश जारी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा शुल्कात किती वाढ केली आहे?
H-1B व्हिसा शुल्का १ लाख अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत ८.८ दशलक्ष डॉलर्स वाढ करण्यात आली आहे.
टेक कंपन्यांनी H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना काय मेसेज पाठवला?
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, टेक कंपन्यांनी परदेशात असलेल्या H-1B धारक कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा आणि आणि नोकरी न सोडण्याचे आवाहन केले आहे.
भारतीयांसाठी H1-B व्हिसा होणार बंद? जाणून घ्या काय म्हणाले अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर