नोकिया (Nokia) कंपनीचा एकेकाळी मोबाईल मार्केटमध्ये फार बोलबाला होता. मोबाईल कंपन्यांमध्ये याचे नाव उच्च स्तरावर होते. मात्र जसजशा नवनवीन कंपन्या येऊ लागल्या हळूहळू कंपनी मार्केटमधून बाहेर पडली, पण तरीही ती आजही अनेक सेवा देत आहे. आता माहितीनुसार, नोकियाकडून वोडाफोन आयडियाला एआय (AI) सपोर्ट दिला जात आहे. MantaRay च्या नावाखाली येणारा हा सपोर्ट म्हणजे Self Organizing Network (SON) सोल्यूशन आहे. आतापर्यंत ही सर्व्हिस 4G नेटवर्कसाठी दिली जात होती, परंतु आता ती 5G नेटवर्कसाठीही दिली जाणार आहे.
नोकियाचे (Nokia) म्हणणे आहे की, हे सोल्युशन 1 दशलक्ष 4G आणि 5G सेल ऑप्टिमाइझ करेल. हा जागतिक स्तरावरील सर्वात मोठा SON बनेल. कंपनीने सांगितले की, त्याच्या मदतीने ते युजर्सना हाय-कपॅसिटी आणि एनर्जी-एफिशिएंट कनेक्टिव्हिटी इनॅबल करून देते, जे खूप चांगले सपोर्ट देते. MantaRay SON द्वारे मशीन लर्निंग (ML) अल्गोरिदम प्रदान केले जातात. हे नेटवर्क पूर्णपणे AI आधारित असणार आहे.
AI फीचर्स आणि दोन कॅमेऱ्यांनी सुसज्ज हा चष्मा आहे खास, ChatGPT देतो प्रश्नांची उत्तर
Vodafone-Idea ने Ericsson-Samsung सोबत केली होती डील
Vi ने 4G नेटवर्क अपग्रेड आणि 5G नेटवर्क रोलआउटसाठी फिनिश कंपनी नोकिया (Finnish company Nokia), स्वीडिश कंपनी एरिक्सन (Swedish company Ericsson) आणि दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग (South Korean company Samsung) सोबत 30 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. या करारानंतरच व्होडाफोन-आयडियाने आपल्या विस्ताराला गती दिली. Vi नेटवर्क विस्तारामध्ये, एरिक्सन (Ericsson) सुमारे 40 टक्के आणि नोकिया सुमारे 20 टक्क्यांनी मार्केटचा विस्तार करेल, म्हणजे नोकियासोबत एरिक्सनही भागीदार होता. पण आता नोकियाने कंपनीसाठी AI सपोर्ट देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘itel’ चा अनोखा उपक्रम, ‘पुष्पा 2’ थीमवर लाँच करणार A80 स्मार्टफोन, काय असतील फीचर्स? जाणून घ्या
5G वर सुरु आहे काम
Vi देखील आपल्या 5G नेटवर्क सपोर्टसाठी वेगाने काम करत आहे. बीएसएनएल (BSNL)देखील तेच करत आहे, कंपनीची टेस्टिंग पूर्णत्वाकडे आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वतः फोन करून बीएसएनएलला (BSNL) ग्रीन सिग्नल दिला. याशिवाय BSNL द्वारे 4G नेटवर्कही वेगाने उभारले जात आहे, ज्यामुळे येत्या वर्षात बीएसएनएल युजर्सना लवकरच 5G सर्व्हिस मिळण्याची आशा आहे.