Google ने सादर केले नवे AI इमेज जेनरेशन मॉडेल... Nano Banana 2 ने सर्वांना केलं चकित, आता इमेजेस होणार आणखी रिअलिस्टिक
गूगलने नॅनो बनाना 2 ला फास्ट इमेज जेनरेशन, एडिटिंग आणि क्विक एडिटसाठी डिझाईन केले आहे. नवीन मॉडेल जेमिनीच्या नॉलेट आणि रियल-टाइम वेब इन्फॉर्मेंशनचा वापर करून अचूक ईमेज क्रिएट करणार आहे. या सर्व वैशिष्ट्यांच्या मदतीने हे मॉडेल इन्फोग्राफिक्स, सिंपल डायग्राम आणि डेटा बेस विजुअल जेनरेट करणार आहे. (फोटो सौजन्य – Google)
गुगलचं असं म्हणणं आहे की, हे नवीन मॉडेल ईमेजमध्ये टेस्ट आधीपेक्षा चांगल्या पद्धतीने हँडल करणार आहे. म्हणजेच यूजर्स इमेजमध्ये क्लीअर आणि वाचण्यायोग्य टेक्स्ट जोडू शकणार आहेत. हे नवीन मॉडेल सोशल मीडिया पोस्ट तयार करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. यासोबतच हे मॉडेल इमेज टेक्स्ट ट्रांसलेट देखील करू शकणार आहे. गुगलने लेटेस्ट नॅनो बनाना 2 मॉडेलमध्ये क्रिएटिव कंट्रोल देखील सुधारले आहे. कंपनीने असा दावा देखील केला आहे की, वेगवेगळ्या आस्पेक्ट रेशियो आणि 512 पिक्सेलपासून 4K रिजोल्यूशनच्या इमेज तयार केल्या जाऊ शकतात.
WhatsApp Down: लॉगिन फेल, कामं अडकली… मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक बिघाड? X वर तक्रारींचा पाऊस
नॅनो बनाना 2 गूगलच्या सर्व प्रोडक्ट्ससह रोलआउट केले जाणार आहे. ते जेमिनी अॅप, गुगल सर्चचे एआय मोड आणि लेन्स, एआय स्टुडिओ आणि जेमिनी एपीआय, गुगल क्लाउडचे व्हर्टेक्स एआय, फ्लो आणि गुगल जाहिरातींमध्ये वापरले जाऊ शकते. हे नवीन मॉडेल सर्व गुगल एआय मॉडेल्समध्ये इमेज जनरेशनसाठी लाईव्ह झाले आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन मॉडेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हाय-स्पीड प्रोसेसिंग आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमची इच्छित ईमेज तयार होण्याची किंवा संपादित होण्याची वाट पाहण्याची गरज नाही.






