WhatsApp Update: ऑनलाईन न दिसताच वाचा मेसेज, ब्लू टिकही होईल गायब... अशी आहे सोपी ट्रिक
BSNL Recharge Offer: सरकारी कंपनीची खास ऑफर; ‘या’ प्लॅनवर मिळणार फ्री बोनस डेटा… जाणून घ्या किंमत
अनकेदा आपल्याला असं वाटतं की, समोरील व्यक्तीला न समजता त्याने पाठवलेले सर्व व्हॉट्सअॅप मेसेज आपण वाचावे. पण सहसा आपण जेव्हा समोरील व्यक्तीचा मेसेज ओपन करतो, तेव्हा ब्लू टिक दिसू लागते किंवा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला तुमचा ऑनलाईन स्टेटस दिसतो. ज्यामुळे त्वरित समजते की, तुम्ही फोनवरील मेसेज वाचला आहे. पण तुम्हाला माहिती आहे की, अशी एक सोपी ट्रिक आहे जी फॉलो करून तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपवर समोरील व्यक्तीला ऑनलाईन दिसता मेसेज वाचू शकता. यामध्ये ब्लू टिक देखील दिसणार नाही. या सोप्या आणि फायद्याच्या ट्रिकबद्दल आता जाणून घेऊया.
खरं तर ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करण्याची गरज नाही. तुम्ही एका खास व्हॉट्सअॅप विजेट्सच्या मदतीने हे काम अगदी सहज पूर्ण करू शकता. विजेट्सच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅप ओपन करताच तुम्ही थेट होम स्क्रीनवर नवीन मेसेज पाहू शकता. ज्या लोकांना त्यांच्या प्रायव्हसची सतत चिंता असते किंवा ज्यांना समोरील व्यक्तीला समजू द्यायचे नसेल की तुम्ही त्यांचा मेसेज वाचला आहे, अशावेळी ही ट्रिक फायद्याची ठरू शकते. चला तर मग आता या सोप्या ट्रिकबद्दल जाणून घेऊया.






