नथिंग या लंडन मधील कंपनीचा सह-ब्रँड असलेल्या CMF ने रश्मिका मंदाना या प्रसिद्ध भारतीय चित्रपट उद्योगातील अभिनेत्री सोबत भागीदारीची घोषणा केली. CMF उत्पादनांसाठी ब्रँड अँबासिडर म्हणून, रश्मिका डिजिटल, प्रिंट, आणि TVC मोहिमांमध्ये सातत्याने दिसेल जी CMF उत्पादनांचे नवकल्पक जोश आणि स्टायलिश भाव सादर करेल.
नथिंग इंडियाचे अध्यक्ष विशाल भोला म्हणाले, “CMF कुटूंबामध्ये रश्मिका मंदानाचे स्वागत करतांना आम्हाला आनंद होत आहे,”. ते पुढे म्हणाले, “नथिंग प्रस्तुत CMF दैनंदिन अनुभव सुधारण्यासाठी सुंदर, कार्यात्मक, आणि विचारपूर्वक डिव्हाईसेस बनविण्याच्या आमच्या तत्वज्ञानाला मूर्त स्वरूप देते. तंत्रज्ञान केवळ नवकल्पकच असायला नको, तर तो आनंद आणि स्वतःचे अस्तित्व असलेला स्त्रोत असायला हवा असा आमचा विश्वास आहे. रश्मिका मंदाना तिच्या डायनॅमिक व्यक्तिमत्व, जोश आणि समर्पण यांमुळे नथिंग प्रस्तुत CMF साठी उत्तम ठरते, आणि आमच्या ग्राहकांना आमचा ब्रँड सादर करणे आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी तिने कार्य करावे यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
या भागीदारीबद्दल बोलतांना, रश्मिका म्हणाली, “नथिंग प्रस्तुत CMF ची ब्रँड अँबासिडर म्हणून भागीदारी बद्दल मला आनंद आहे. CMF मध्ये सहभाग घेतल्यावर मला माझ्या नवीन आणि आकर्षक काहीतरी सुरू करण्याच्या माझ्या प्रवासाची आठवण झाली. आकर्षक रंग आणि निराळी उत्पादने यांनी मला लगेच आकर्षित केले. हे सहकार्य फारच योग्य आणि नैसर्गीक आहे कारण मलाही आकर्षक डिझाइन्स आणि उत्तम सौंदर्यशास्त्र यांची आवड आहे. CNF मध्ये सहभागी होण्यासाठी आणि निराळे काहीतरी करण्यासाठी मी आता वाट बघू शकत नाही.”
CMF ने CMF फोन 1 च्या नाविन्यपूर्ण आणि कस्टमाइज करण्यायोग्य डिझाइनचे अनावरण केले, जो असा स्मार्टफोन आहे जो पर्सनलायजेशन आणि कार्यक्षमता (फंक्शनॅलिटी) म्हणजे काय हे पुन्हा एकदा दाखवून देतो. काळा, नारंगी, हलका हिरवा आणि निळा अशा चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – CMF फोन 1 प्रत्येकाच्या आवडीनुसार वैविध्यपूर्ण पॅलेट उपलब्ध करून देतो. काळ्या आणि हलक्या हिरव्या रंग थेट केसमध्येच टेक्श्चर तयार करतो तर निळा आणि नारंगी मध्ये वरच्या बाजूस एक मोहक व्हेगन लेदर लेयर देतो.
CMF फोन 1 चे डिझाइन कार्यक्षमता (फंक्शनॅलिटी) आणि स्वतंत्रपणा यांना प्राधान्य देते. यूजर विविध रंग किंवा मटेरियलसाठी केसेस सहजपणे अदलाबदल करू शकतात किंवा त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कस्टमायजेशनला नवीन अर्थ देऊन त्यांच्या हेतूप्रमाणे ऍक्सेसरीज जोडू शकतात.
8 जुलै रोजी वॉच प्रो 2 आणि बड्स प्रो 2 च्या लॉन्चिंगसह CMF फोन 1 च्या अत्यंत अपेक्षित लॉन्चसाठी उत्साहपूर्ण वातावरणातच ही सुद्धा घोषणा करण्यात आली आहे. ही आगामी उत्पादने एकत्रितपणे परवडणाऱ्या किमतीत निराळे दैनंदिन तंत्रज्ञान अनुभव देण्यासाठी CMF च्या अत्याधुनिक डिझाइन आणि कार्यक्षमतेसह वचनबद्धतेला मूर्त रूप देतात.