UPI Without Bank Ac: बँक अकाऊंट नसतानाही करू शकाल UPI पेमेंट, काय आहे प्रोसेस? जाणून घ्या
UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) ने देशात डिजिटल व्यवहार खूप लोकप्रिय केले आहेत. बरेच लोक फक्त PhonePe, Paytm आणि Google Pay द्वारे लहान ते मोठे पेमेंट करतात. UPI मुळे सुट्ट्या पैशांची कटकट नाही. आपण सर्वचजण अगदी सहज काही क्षणात UPI च्या मदतीने ऑनलाईन पेमेंट करू शकतो. किराणा खरेदी असो किंवा ऑनलाइन पेमेंट असो, सर्वत्र लोक UPI द्वारे पेमेंट करत आहेत. त्यामुळे लोकांनी रोख रक्कम बाळगणे जवळपास कमी केले आहे.
हेदेखील वाचा- AI परिवर्तनामुळे 2028 पर्यंत 2.73 मिलीयन टेक रोजगार निर्माण होणार; सर्विसनाऊ एआय स्किल्स अँड जॉब्स रिपोर्ट
UPI पेमेंटवर वापरकर्त्यांच्या सोयीसाठी नवीन फीचर्स जोडण्यात आली आहेत. पूर्वी UPI पेमेंटसाठी बँक अकाऊंट असणं आवश्यक होते, मात्र आता तसं नाही. म्हणजेच तुमचे बँक अकाऊंट नसले तरी देखील तुम्ही UPI अकाऊंट तयार करू शकता आणि ऑनलाईन पेमेंट करू शकता. येथे आम्ही तुम्हाला बँक अकाऊंटशिवाय UPI अकाऊंट कसे तयार करायचे याची प्रोसेस सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
NPCI ने अलीकडेच डेलीगेटेड पेमेंट सिस्टम लाँच केले आहे. त्याच्या मदतीने, युजर्स बँक अकाऊंट नसतानाही UPI अकाऊंट तयार करू शकतात आणि ऑनलाईन पेमेंट करू शकतात. याआधी UPI सेवा वापरण्यासाठी बँक अकाऊंट असणे आवश्यक होते. मात्र आता तुम्ही तुमच्या कुटूंबियांच्या किंवा मित्र मैत्रिणींच्या बँक अकाऊंटच्या मदतीने तुमच्यासाठी UPI अकाऊंट तयार करू शकता.
NCPI च्या नवीन फीचरनंतर UPI सेवेसाठी बँक अकाऊंटची गरज भासणार नाही. आता वापरकर्ते त्यांच्या बचत खात्यातून इतरांसाठी UPI अकाऊंट तयार करू शकतात. ही सेवा सक्षम करण्यासाठी, युजर्सना एक लहान वेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे, त्यानंतर युजर्स पेमेंट करू शकतात.
हेदेखील वाचा- Chrome यूजर्ससाठी धोक्याची घंटा! सरकारने जारी केली चेतावणी, अनेक वर्जनमध्ये सिक्योरिटी रिस्क
UPI च्या या फीचरच्या मदतीने तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांसाठी UPI अकाऊंट मॅनेज करू शकता. याचे संपूर्ण नियंत्रण प्राइमरी अकाउंट होल्डरकडे राहणार आहे. प्रायमरी अकाउंट होल्डरला लिंक केलेल्या अकाऊंटवर पेमेंट ॲक्सेस अनेबल आणि डिसेबल करण्याचा पर्याय असणार आहे.
स्टेप 1 – सर्वप्रथम, तुम्हाला UPI पेमेंट ॲपमधील UPI सर्कलवर क्लिक करावे लागेल आणि ‘Add Family and Friend’ वर टॅप करावे लागेल.
स्टेप 2 – आता तुम्हाला सेकेंडरी UPI आयडी टाकावा लागेल. यासाठी तुम्ही थेट तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून त्याचा नंबर जोडू शकता.
स्टेप 3 – यानंतर तुम्हाला सेकेंडरी अकाऊंटची मर्यादा आणि प्रत्येक पेमेंटचा अप्रूवल सेट करण्याचा पर्याय मिळेल.
स्टेप 4 – सेकेंडरी वापरकर्त्यास रिक्वेस्ट एक्सेप्ट करण्यासाठी नोटिफिकेशन येईल. रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर, सेकेंडरी वापरकर्ता UPI अकाऊंटमधून व्यवहार करू शकेल.