एसटीने दिली साडेचार कोटींची नुकसान भरपाई (फोटो- सोशल मीडिया)
चंद्रकांत कांबळे/पुणे: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)पुणे विभागात जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यात झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसान भरपाईचा आकडा ४ कोटी ७३ लाख २८ हजार ५५६ रूपये आहे. अनेक मार्गांनी अपघात होत असले तरी त्याचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत असल्याने चालकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी म्हणून चालकांचे समुपदेशन आणि आरोग्य तपासणी करण्यावर महामंडळाला भर द्यावे लागत आहे.
अगोदरच आर्थिक तोट्यात असलेल्या महामंडळाला रोजच्या उत्पन्नाची चिंता असताना खर्चातील वाढही तोट्यात भर घालणारी ठरत आहे. या अपघातात १९ जणांचा मृत्यु झालेला आहे.तर गंभीर जखमीची संख्या ५२ आहे. किरकोळ जखमीची संख्या ८५ आहे. एकूण १५६ जणांचा समावेश आहे.
पुणे विभागातून अपघातग्रस्त प्रवाशांना जानेवारी ते सप्टेंबर २०२५ मध्ये ४ कोटी ७३ लाख २८ हजार ५५६ रुपये इतकी नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. पी फॉर्म,आणि कोर्टतून ही आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. या पुढे अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महामंडळाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये त्यांचे समुपदेशन करूण तसेच त्यांना पुन्हा रिफ्रेशमेंट कोर्सला पाठविले जाते.
St Bus: मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही, ७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
नऊ महिन्यातील अपघातांचे स्वरूप
स्वरूप संख्या
मृत्य १९
गंभीर ५२
किरकोळ ८५
एकूण १५६
MSRTC Revenue: ‘एसटी’ची दमदार कामगिरी! पुणे विभाग राज्यात अव्वल; तब्बल 20 कोटींपेक्षा…
राज्य परिवहन प्रवाशांसाठी आर्थिक मदत
तपशील रक्कम
प्रवाशाचा मृत्यु १०,००,०००
कायम स्वरुपाच्या विकलांगतेत पर्यवसन होणारी दुखापत ५,००,०००
कायम स्वरुपाच्या विकलांगतेत पर्यवसन होणारी अंशतः दुखापत २,५०,०००
तात्पुरत्या विकलांगतेत पर्यवसन होणारी दुखापत १०००
ही नुकसान भरपाई नियमानुसार देण्यात आलेली आहे.वाहतूक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी असून सुरक्षित वाहन चालविणे ही चालकांची जबाबदारी आहे. चालकांनी सुरक्षा तसेच वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकेल. ही जबादारी केवळ एस.टी. चालकांची नाही तर इतर चालक आणि विशेषत: दुचाकीस्वारांनी नियमांचे पालन करून वेगावर नियंत्रण ठेवले तर अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल.
अरुण सिया,
विभाग नियंञक,पुणे विभाग






