स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! पावरफुल फीचर्ससह लाँच झाला स्वस्त 5G फोन, 7,000mAh बॅटरीने सुसज्ज
स्मार्टफोन कंपनी पोकोने भारतात त्यांचा नवीन बजेट 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Poco M7 Plus 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठ्या बॅटरीसह रिवर्स चार्जिंगसारखे अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या स्मार्टफोनमध्ये पावरफुल स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 चिपसेट आणि डुअल कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनवर ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. ज्यामुळे हा स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
Poco M7 Plus 5G स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज या ऑप्शन्सचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. तर या स्मार्टफोनचा टॉप-एंड व्हेरिअंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 14,999 रुपयांच्या किंंमतीत लाँच करण्यात आला आहे. लाँच ऑफर म्हणून, ग्राहकांना एचडीएफसी, एसबीआय किंवा आयसीआयसीआय कार्डसह निवडक बँक कार्ड वापरून 1,000 रुपयांची अतिरिक्त बँक सूट देखील मिळू शकते, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते. (फोटो सौजन्य – X)
Poco M7 Plus 5G launched in India
Poco M7 Plus 5G specifications:
– 6.9-inch FHD+ LCD, up to 144Hz RR, 850nits brightness
– Snapdragon 6s Gen 3,
– Up to 8GB LPDDR4X RAM | 6GB virtual RAM
– Up to 128GB UFS 2.2 storage |
– 7,000mAh battery | 33W charging | 18W reverse charging
-… pic.twitter.com/LdlkVW2ats— Anvin (@ZionsAnvin) August 13, 2025
याशिवाय कंपनी या फोनवर खास 1,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस देखील देत आहे. हा फोन अॅक्वा ब्लू, कार्बन ब्लॅक आणि क्रोम सिल्व्हर रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. या डिव्हाइसची पहिली विक्री पुढील आठवड्यात 19 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल. आता Poco M7 Plus 5G च्या स्पेसिफिकेशन्सवर एक नजर टाकूया. ऑफरनंतर, फोनची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये होईल.
स्पेसिफिकेशनबद्दल बोलयाचं झालं तर डिव्हाईसमध्ये तुम्हाला 144Hz रिफ्रेश रेट वाला 6.9-इंच फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कमी किंमतीत हा स्मार्टफोन मोठा डिस्प्ले ऑफर करत आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 850 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि याला लो ब्लू लाइट, फ्लिकर-फ्री आणि सर्कैडियन स्टँडर्ड्ससाठी TUV रीनलँड सर्टिफिकेशन देखील देण्यात आलं आहे. ज्यामुळे फोन आणखी खास होतो.
या डिव्हाईसमध्ये पावर देण्यासाठी एक खास स्नॅपड्रॅगन 6s जेनरेशन 3 चिपसेट वापरण्यात आला आहे, जो 8GB पर्यंत रॅमसह येतो. हे डिव्हाईस अँड्रॉइड 15-बेस्ड हाइपरOS 2.0 वर चालते. एवढंच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 33W चार्जिंग सपोर्टसह 7,000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेराच्या बाबतीतही हा फोन खूपच चांगला आहे जिथे डिव्हाइसमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.