Youtube वर पसरलंय 'घोस्ट नेटवर्क' चं जाळ, व्हिडीओमधील लिंकवर क्लिक करताच..... स्वत:ला असं ठेवा सुरक्षित
आता जर तुम्ही यूट्यूबवर एखादा व्हिडीओ बघितल्यानंतर त्याच्यासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही मालवेअरचे शिकार होऊ शकता. खरं तर, सिक्योरिटी रिसर्चरने यूट्यूबवर सुरु असलेल्या एका मोठ्या मालवेयर मोहिमेचा पर्दाफाश केला आहे. याला यूट्यूब घोस्ट नेटवर्क असं नाव देण्यात आलं आहे. हे नेटवर्क खोटे ट्यूटोरियल व्हिडीओ तयार करून आणि पायरेटेड चॅनेल वापरून लोकांच्या सिस्टममध्ये मालवेअरने संक्रमित करत होते. अलीकडेच चेक प्वाइंट येथील रिसर्चरने याचा पर्दाफाश केला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे नेटवर्क हजारो व्हिडिओ शिकवण्याच्या सॉफ्टवेअर इत्यादींद्वारे ऑपरेट केले जात होते. या ट्यूटोरियल व्हिडीओसह हॅकर्स माइक्रोसॉफ्ट ऑफिस सारख्या एखाद्या सॉफ्टवेअरचे क्रॅक वर्जन देण्याचे आश्वासन करत होते. व्हिडीओमध्ये गूगल ड्राइव किंवा ड्रॉपबॉक्समधून फाइल डाऊनलोड करण्यासाठी सांगितलं जात होतं. जेव्हा युजर्स या लिंकवर क्लिक करून व्हिडीओ डाऊनलोड करत होते तेव्हा त्यांच्या सिस्टिममध्ये मालवेयर इंस्टॉल होत होता. ज्यामुळे हॅकर्स सिस्टममधील पासवर्ड, कुकीज आणि लॉगइन इत्यादी माहिती चोरी करू शकत होते.
हि सिस्टम पूर्णपणे विश्वसनीय वाटावी यासाठी हॅकर्सनी पूर्ण बंदोबस्त केला होता. सिस्टम विश्वसनीय वाटावी यासाठी हॅकर्स व्हिडीओखाली बनावट कमेंट्स करत होते, ज्या खऱ्या वाटतील. कमेंटमध्ये फाइल ओपन करण्यासाठी पासवर्ड देखील दिले होते. ज्यामुळे लोकांना वाटू शकेल की दुसरी लोकं देखील या फाईल्स डाऊनलोड करू त्याचा वापर करत आहेत. हे नेटवर्क अतिशय संघटित पद्धतीने काम करत होते. हॅकर्स एक चॅनेल डिलीट होताच दुसरा चॅनेल्स तयार करायचे. याशिवाय, त्यांनी लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी चोरी केलेल्या YouTube चॅनेलवरून असेच व्हिडिओ देखील पोस्ट केले.
iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर
सध्या इंटरनेटवर अनेक प्रकारचे स्कॅम सुरु आहेत. या स्कॅमपासून स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही अनोळखी नबंरवरून आलेल्या लिकंवर क्लिक करू नका. मोफत किंवा क्रॅक सॉफ्टवेअर देणाऱ्या लिंक्स टाळणे हाच सर्वोत्तम आणि सुरक्षित बचाव आहे. थोड्याशा लोभामुळे तुमचं मोठे नुकसान होऊ शकते.






