Andromeda XXXV: खगोलशास्त्रज्ञांनी शोधली अवकाशातील सर्वात छोटी आकाशगंगा, जिने आतापर्यंतचे सर्व दावे ठरवले खोटे!
खगोलशास्त्रज्ञांनी एक नवीन शोध लावला आहे. त्यांनी आतापर्यंतची सर्वात छोटी आकाशगंगा शोधली आहे. खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेली ही आकाशगंगा एंड्रोमेडा आकशगंगेच्या चारी बाजूंनी फिरत आहे. खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेल्या या छोट्या आकाशगंगेला Andromeda XXXV असं नाव देण्यात आलं आहे. खगोलशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आकाशगंगा आतापर्यंतची सर्वात छोटी आकाशगंगा आहे.
या शोधानंतर आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, ही छोटी आकाशगंगा आतापर्यंत टिकून कशी राहिली? खगोलशास्त्रज्ञांचं असं मत आहे की, छोटी आकाशगंगा ब्रह्मांडमध्ये उष्ण आणि दाट परिस्थितीत जास्त काळ टिकू शकत नाहीत. मात्र आता Andromeda XXXV या आकाशगंगेमुळे हा नियम खोटा ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मिशिगन यूनिवर्सिटच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की, या आकाशगंगा पूर्णपणे कार्यरत आहेत, परंतु त्या आपल्या आकाशगंगेपेक्षा सुमारे दहा लाख पट लहान आहेत. या आकाशगंगा एखाद्या तांदळाच्या दाण्याएवढ्या आकाराच्या आहेत, असं म्हटलं तरी हरकत नाही. (फोटो सौजन्य – X)
छोटी आकाशगंगेचा शोध लावणं ही कोणतीही नवीन गोष्ट नाही. आपली आकाशगंगा देखील इतर अनेक आकाशगंगेपेक्षा छोटी आहे. मात्र एखाद्या दूरवर असणाऱ्या सर्वात छोट्या आकाशगंगेचा शोध लावण फार कठीण काम आहे. आकाशगंगेभोवती अशा अनेक छोट्या आकारच्या आकाशगंगा आहेत, ज्यांचा यापूर्वी शोध लावण्यात आला आहे. मात्र जर Andromeda XXXV बद्दल बोलायचं झालं तर, काही कठीण गोष्टी देखील आहेत. Andromeda XXXV आकाशंगगेचा प्रकाश इतका प्रचंड आहे की त्याच्याभोवती असणाऱ्या इतर छोट्या आकाशगंगा शोधणं कठीण झालं आहे. ज्यामुळे सध्या ही नवीन आकाशगंगा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
मिशिगन यूनिवर्सिटीचे खगोलशास्त्रज्ञ मार्कोस एरियास आणि त्यांच्या पथकाने अनेक मोठ्या खगोलशास्त्रीय डेटा संचांचे परीक्षण केले आहे. त्यांनी या परीक्षणात Hubble Space Telescope ची देखील मदत घेतली. खगोलशास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, Andromeda XXXV केवळ एक सॅटेलाइट गॅलेक्सीच नाही तर ही इतकी छोटी आहे की, आपली आकाशगंगा कशी तयार झाली याबद्दलच्या सिद्धांतांना आव्हान देऊ शकते.
मोठ्या आकाशगंगा त्यांच्या सभोवताली असणाऱ्या छोट्या आकाशगंगाना त्यांच्याकडे खेचून घेतात. या आकाशगंगेतील वायू संपताच त्यांच्यातील स्टार फॉर्मेशन थांबते आणि हळूहळू या आकाशगंगांचा मृत्यू होतो. आकाशगंगेतील छोट्या आकाशगंगा 10 अब्ज वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडल्या. मात्र एंड्रोमेडाच्या छोट्या आकाशगंगा 6 अब्ज वर्षांपूर्वी देखील तारे तयार करत होती. ब्रह्मांडच्या सुरुवातीला तापमान आणि घनता प्रतंड जास्त असते. या उष्णतेमुळे अनेक छोट्या आकाशगंगांचा मृत्यू होतो. मात्र Andromeda XXXV आकाशगंगेने हा नियम तोडला आहे.