Tech layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
या वर्षी 1 लाख 28 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्याlayoffs.fyi नावाचं एक पोर्टल आहे जे जगभरात कुठे किती लोकांना काढलं याचा हिशोब ठेवतं. त्यांच्या रिपोर्टनुसार या वर्षी आतापर्यंत 303 टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढलं आहे. एकूण 1,28,873 लोकांना घरी बसावं लागलं आहे. हा आकडा खूप मोठा आहे.यामध्ये ओरॅकल, अॅमेझॉन, उबर, पेपल सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
सध्या सगळ्यात जास्त चर्चा ओरॅकलचीच आहे. या कंपनीने या वर्षी आधीच 21,000 लोकांना कामावरून काढलं होतं. आणि आता परत नवीन लिस्ट तयार होत आहे. कंपनीने अजून अधिकृतपणे किती लोकांना काढणार हे सांगितलं नाही, पण आतल्या बातमीनुसार मोठी कपात होणार आहे.अॅमेझॉन, डेल, मेटा पण मागे नाहीतअॅमेझॉनने या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये 16,000 लोकांना काढून टाकलं. अॅमेझॉन पण आता सगळीकडे AI वापरत आहे, त्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी होत आहे.तसंच डेल कंपनीने मार्च महिन्यात 11,000 लोकांना घरी पाठवलं. यामध्ये पण AI चा मोठा रोल होता.फेसबुकची कंपनी असलेल्या मेटाने पण या वर्षी अनेक वेळा लोकांना काढलं आहे. एक-दोन वेळा नाही तर अनेक फेऱ्यांमध्ये कपात केली आहे.
जगातल्या जवळपास सगळ्या मोठ्या कंपन्या आता AI मध्ये पैसा लावत आहेत. AI मुळे बरीच कामं आपोआप होतात, माणसाची गरज लागत नाही. कोडिंग असेल, कस्टमर सपोर्ट असेल, डेटा चेक करणं असेल, ही सगळी कामं आता AI करतं.कंपन्यांचं म्हणणं सोपं आहे, जेव्हा मशीनच काम करतंय तर इतके कर्मचारी कशाला ठेवायचे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी कंपन्या लोकांना काढत आहेत.पूर्वी वाटायचं AI आल्यावर नवीन नोकऱ्या येतील, पण सध्या तरी उलटं होताना दिसतंय. जुन्या नोकऱ्या जात आहेत आणि नवीन नोकऱ्यांसाठी वेगळं स्किल लागणार आहे. त्यामुळे टेक क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकाला आता AI शिकावंच लागणार आहे, नाहीतर नोकरी टिकवणं अवघड होईल.
हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा






