फोटो सौजन्य - Social Media
भारतातील अग्रगण्य डिजिटल पेमेंट्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी पेटीएमने वापरकर्त्यांच्या सोयीसाठी एक अभिनव फीचर लॉन्च केले आहे. ‘रिमाइंडर’ फीचर. या नव्या सुविधेमुळे ट्यूशन फी, ईएमआय, घरभाडे, वीजबिल, नोकरांचा पगार, सबस्क्रिप्शन अशा नियमित खर्चांचे पेमेंट वेळेत करणे आता अधिक सोपे आणि सुटसुटीत होणार आहे.
पेटीएमचे हे फीचर वापरकर्त्यांच्या पेमेंट हिस्ट्रीचे विश्लेषण करून पुनरावृत्ती होणारे व्यवहार आपोआप ओळखते, आणि त्यावर आधारित रिमाइंडर सेट करण्याचा सल्ला देते. त्यामुळे जे पेमेंट्स दर महिन्याला ठराविक तारखांना होत असतात, ते पुढील वेळी विसरले जाण्याची शक्यता राहत नाही.
याशिवाय, अॅपमध्ये आगामी व पूर्ण झालेल्या सर्व पेमेंट्सचे एकत्रित दृश्य मिळते, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या खर्चाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येते. हे फीचर बजेट मॅनेजमेंट आणि आर्थिक शिस्त राखण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
रिमाइंडर सेट करण्यासाठी:
ठरलेल्या दिवशी पेटीएमकडून नोटिफिकेशन येईल, ज्यामुळे कोणतेही बिल, फी किंवा ईएमआय चुकणार नाही.
पेटीएमचे हे नवे फीचर वापरकर्त्यांना त्यांचे खर्च स्मार्टपणे व्यवस्थापित करण्यास, बजेटवर नियंत्रण ठेवण्यास आणि प्रत्येक व्यवहार वेळेवर पूर्ण करण्यास मदत करणार आहे. त्यामुळे “पेमेंट विसरलं!” हा वाक्यप्रचार आता हळूहळू इतिहासजमा होणार आहे.






