Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन? पंतप्रधान मोदींच्या ‘या’ वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, वाचा सविस्तर

ऑस्ट्रेलियातील 16 वर्षांखालील मुलांसाठीच्या सोशल मीडिया बंदीच्या कायद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर भारतातही अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर कडक नियम लागू होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 11, 2026 | 01:38 PM
भारतात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन? पंतप्रधान मोदींच्या 'या' वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, वाचा सविस्तर

भारतात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया होणार बॅन? पंतप्रधान मोदींच्या 'या' वक्तव्यानंतर चर्चेला उधाण, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या सोशल मीडिया कायद्याचे कौतुक केले.
  • 16 वर्षांखालील मुलांसाठी भारतातही नियम येण्याची चर्चा सुरू.
  • मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी कडक कायद्यांवर भर वाढण्याची शक्यता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियामध्ये सोशल मीडियाबाबत तयार करण्यात आलेल्या नवीन कायद्याचे कौतुक केले आहे आणि म्हटलं आहे की, भारताला यातून काही शिकले पाहिजे. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर आता भारतात देखील सोशल मीडियाबाबत नवीन कायदा लागू केला जाणार का, अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. भारतातील काही राज्यांमध्ये अलीकडेच 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणं होणार सुपरफास्ट! IRCTC घेऊन येतेय नवीन वेबसाईट… यूजर्सना मिळणार नवा अनुभव

सोशल मीडियामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, अशी चिंता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. याचाच विचार करून भारतातील काही राज्यांमध्ये आधीच लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी लागू केलेल्या सोशल मीडिया बंदीच्या कायद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केल्यानंतर, भारतातही अल्पवयीन मुलांसाठी अशाच प्रकारचा कायदा लागू होणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

ऑस्ट्रेलियाच्या मेनलबर्न येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया शिखर परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि इतर देशांनी ऑस्ट्रेलियाच्या सोशल मीडिया नियमांमधून खूप काही शिकण्यासारखे आहे. आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या आयटी आणि सोशल मीडियासंबंधित कायद्यात झालेल्या बदलांची प्रशंसा केली.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले की, ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामधून भारत आणि इतर देशांनी बरेच काही शिकले आहे. ऑस्ट्रेलिया ज्या प्रकारे आयटी आणि सोशल मीडिया कायद्यांमध्ये बदल करत आहे, ते समाजाच्या सुरक्षेसाठी प्रेरणादायी आहे. मुलांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलिया करत असलेल्या प्रयत्नांमधून भारतही बरेच काही शिकत आहे.

मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींनी केलेले कौतुक अनेक संकेत देत आहे. भारत सरकारने यापूर्वीही मुलांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया ठरला पहिला देशष

ऑस्ट्रेलिया जगातील पहिला असा देश आहे, ज्यांनी 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल मीडिया पूर्णपणे बॅन केला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा कायदा डिसेंबर 2025 रोजी लागू करण्यात आला होता. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, इंस्टाग्राम, टिक-टॉक, स्नॅपचॅट इत्यादीवर मोठ्या संख्येत 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या अकाऊंटवर बंदी घालण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना कठोर निर्देश जारी केले की, कमी वय असलेल्या यूजर्सवर कठोरपणे लक्ष ठेवा.

OpenAI चे मोठे पाऊल! ChatGPT Work AI एजेंट लाँच; फक्त प्रश्नांची उत्तरे नाही, आता पूर्ण प्रोजेक्टही हाताळणार

ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या या निर्णयानंतर भारतातील अनेक राज्य सरकारांनी देखील 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करण्याचा निर्णय घेतला. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटकसह अनेक राज्य सरकारने या संदर्भात कायदे जाहीर केले आहेत. इतकेच नाही, तर यूकेने अलीकडेच मुलांसाठी सोशल मीडियावर आणि गेमिंगच्या लाइव्ह-स्ट्रीमिंगवर बंदी जाहीर केली आहे.

Web Title: Pm modi praises australias social media law will india introduce similar rules for children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • Social Media
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?
1

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट
2

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express
3

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?
4

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.