Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.४ तीव्रतेच्या भूकंपाने हाहाकार; मिंडानाओ बेटावर जोरदार धक्के, 'रिंग ऑफ फायर'मुळे जगाची चिंता वाढली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Philippines earthquake 7 January 2026 : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच निसर्गाच्या कोपाने फिलीपिन्सला हादरवून सोडले आहे. आज, बुधवार (दि. ७ जानेवारी २०२६) रोजी सकाळी दक्षिण फिलीपिन्सच्या (Philippines) किनारपट्टीवर ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण (USGS) नुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू मिंडानाओ बेटावरील सॅंटियागो (Santiago) शहरापासून सुमारे २७ किलोमीटर पूर्वेला समुद्रात होता. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता ६.७ नोंदवण्यात आली होती, मात्र नंतर ती सुधारून ६.४ करण्यात आली.
स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:०२ च्या सुमारास जेव्हा हा भूकंप झाला, तेव्हा लोक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. दावाओ ओरिएंटल प्रांतातील एक मदत कर्मचारी नॅश परागास यांनी सांगितले की, “मला अचानक जमिनीचा थरकाप जाणवला. रस्त्यावरील उभ्या असलेल्या गाड्या जोरजोरात हलत होत्या. हा धक्का साधारण पाच सेकंद टिकला, पण त्या पाच सेकंदांनी सर्वांची घाबरगुंडी उडवली.” सुदैवाने, या भूकंपात अद्याप कोणत्याही इमारती पडल्याचे किंवा कोणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
भूकंप समुद्रात ५८.५ किलोमीटर खोलीवर झाल्यामुळे त्सुनामीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने स्पष्ट केले आहे की, सध्यातरी त्सुनामीचा कोणताही धोका नाही. असे असले तरी, फिलीपिन्सच्या भूकंपशास्त्र विभागाने (Phivolcs) नागरिकांना ‘आफ्टरशॉक्स’ (भूकंपानंतर येणारे लहान धक्के) बद्दल सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अनेकदा मुख्य भूकंपानंतर येणारे छोटे धक्के कमकुवत झालेल्या इमारतींना हानी पोहोचवू शकतात.
Strong offshore earthquake near Baganga, Davao Oriental, Mindanao, Philippines: preliminary M6.7, depth about 53 km, widely felt for up to a minute or more in Mati, Davao, General Santos and other Mindanao areas, but no immediate severe damage reports. #lindol #sismo pic.twitter.com/VXJAabYv9H — GeoTechWar (@geotechwar) January 7, 2026
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War: ‘शस्त्रे सोडली होती, पण आता पुन्हा उचलेन’ Maduro अटकेनंतर आता या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांचाही ट्रम्पला युद्धाचा इशारा
फिलीपिन्समध्ये भूकंप होणे ही काही नवी बाब नाही. हा देश जगातील सर्वात सक्रिय भूकंप प्रवण क्षेत्र असलेल्या ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’ (Pacific Ring of Fire) मध्ये स्थित आहे. हा भाग जपानपासून आग्नेय आशियापर्यंत पसरलेला असून, येथे पृथ्वीच्या पट्ट्यांची (Tectonic Plates) सतत हालचाल होत असते. गेल्या ऑक्टोबरमध्येही येथे ७.४ तीव्रतेचा मोठा भूकंप झाला होता, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आजच्या भूकंपाने त्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Venezuela Crisis: ‘आमची नजर…’, व्हेनेझुएलातील US अटॅकनंतर भारताची मोठी प्रतिक्रिया; S Jaishankar यांनी स्पष्टच सांगितलं
भूकंप म्हणजे पृथ्वीच्या पोटातील ऊर्जेचा अचानक होणारा स्फोट. पृथ्वीचा वरचा थर अनेक ‘टेक्टोनिक प्लेट्स’ने बनलेला आहे. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात किंवा घासल्या जातात, तेव्हा प्रचंड दाब निर्माण होतो. जेव्हा हा दाब सहनशक्तीच्या पलीकडे जातो, तेव्हा खडक तुटतात आणि त्यातून मुक्त झालेली ऊर्जा लहरींच्या रूपात पृथ्वीवर कंपन निर्माण करते.






