रेडमी नवीन स्मार्टफोन लॉंच करणार (फोटो- सोशल मीडिया/ट्विटर)
रेडमी लवकरच लॉंच करणार नवीन स्मार्टफोन
108 मेगापिक्सेलचा कमर मिळण्याची शक्यता
6 जानेवारी 2026 रोजी होणार लॉंच
भारतात अनेक मोबाइल कंपन्या आपले नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉंच करत असतात. ज्यामध्ये ग्राहकांना बेस्ट फीचर्स, अनेक नवीन गोष्टी कंपनी देण्याचा प्रयत्न करते. दरम्यान ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेडमी कंपनी भारतीय बाजारपेठेत लवकरच एक नवीन स्मार्टफोन (Tech News) लॉंच करणार आहे. तर हा स्मार्टफोनचे नाव काय असेल? यामध्ये फीचर्स कोणते असणार तसेच याची किंमत किती असणार हे जाणून घेऊयात?
रेडमी कंपनी लवकरच रेडमी नोट 15 5G 108 पिक्सेल एडिशन लॉंच करणार आहे. कंपनी हा स्मार्टफोन 6 जानेवारी 2026 रोजी लॉंच करण्याची शक्यता आहे. कंपनीने या फोनचे डिझाईन समोर आणल्याचे म्हटले जात आहे. यानंतरत टेक्नॉलॉजी क्षेत्रास रस असणाऱ्यांचा उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे.
काय असणार Redmi Note 15 5G 108 पिक्सेल एडिशनमध्ये?
रेडमी कंपनी लवकरच Note 15 5G 108 पिक्सेल एडिशन लॉंच करणार आहे. हा स्मार्टफोन स्लिम फॅक्टरमध्ये येण्याचा अंदाज आहे. यामध्ये AMOLED डिस्प्ले असणार आहे. हा फोन प्रीमियम स्मार्टफोनचा लुक देतो. कंपनी हा फोन मेटल फ्रेममध्ये लॉंच करण्याचा अंदाज आहे.
कधी होणार लॉंच?
रेडमी Note 15 5G 108 पिक्सेल एडिशन नवीन वर्षात म्हणजेच 6 जानेवारी 2026 रोजी लॉंच होण्याचा अंदाज आहे. हा स्मार्टफोन तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकणार आहेत. या फोनबाबत अधिक काही माहिती समोर आले नसले तर याचे काही स्पेसिफिकेशन्स लिक झाल्याचे म्हटले जात आहे.
संभाव्य स्पेशीफिकेशन्स?
1. 6.8 AMOLED डिस्प्ले
2. 120 Hz रिफरेश रेट
3. स्नॅपड्रॅगन चिपसेट
4. HyperOS
5. 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा
6. 5500 mAh क्षमतेची बॅटरी असण्याचा अंदाज






