जेमिमाह रॉड्रिग्स आणि ॲशले गार्डनर(फोटो-सोशल मीडिया)
DC vs GG, WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज १७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायट्स यांच्यात
वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरात जायट्स संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
दिल्लीने महिला प्रीमियर लीग २०२६ च्या हंगामात आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले असून त्यातील ३ सामन्यात विजय तर ३ सामन्यात पराभव पत्करला आहे. जेमीमाहचा संघ गुणतालिकेत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून दिल्ली संघ या स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. तर दुसरीकडे गुजरात जायट्स संघाने देखील या हंगामात एकूण सहा सामने खेळले असून ३ सामन्यात विजय प्राप्त केला तर ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दिल्लीची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सने टॉस जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, ” आम्हाला प्रथम गोलंदाजी करायला आवडते. दुसऱ्या डावात खेळपट्टी थोडी चांगली होते, पण दव पडत नाहीये. खेळपट्टी कडक दिसत आहे आणि चेंडू बॅटवर चांगला येईल. आम्हाला फक्त आमच्या गेम प्लॅनवर टिकून राहण्याची आणि त्याची चांगली अंमलबजावणी करण्याची गरज आहे. १००%, तुम्ही प्रत्येक सामन्यातून खूप काही शिकता, तुम्ही प्रत्येक गोष्ट बरोबर करू शकत नाही, पण संघामुळे मी (कर्णधार म्हणून) चांगली दिसते. आमच्या संघात आज कोणताही बदल नाही.”
🚨 Toss 🚨@DelhiCapitals have won the toss against @Giant_Cricket and elected to bowl first. Updates ▶️ https://t.co/73Ec3xQxKy#TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvDC pic.twitter.com/evGYmfWbFF — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 27, 2026
टॉस गमावणारी गुजरात जायंट्सची कर्णधार ऍशले गार्डनर म्हणाली की, ” आम्ही तसेही प्रथम फलंदाजी करणार होतो, त्यामुळे फारसा फरक पडला नाही. सोफी मधल्या फळीत असल्याने आम्हाला खूप ताकद मिळते – आज रात्री हा एक नाइलाजास्तव केलेला बदल आहे, डॅनी आजारी असल्यामुळे खेळत नाहीये, जॉर्जिया वेअरहॅम परत आली आहे आणि सोफी पुन्हा फलंदाजीच्या क्रमात वरच्या स्थानावर जाईल. आम्हाला फक्त प्रक्रिया योग्य ठेवण्याची गरज आहे आणि बाकी सर्व आपोआप व्यवस्थित होईल.”
दोन्ही संघ खालीलप्रमाणे
दिल्ली कॅपिटल्स : शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), मारिझान कॅप, निकी प्रसाद, चिनेल हेन्री, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा
गुजरात जायंट्स : बेथ मूनी (विकेटकीपर), डॅनी व्याट-हॉज, अनुष्का शर्मा, ॲशले गार्डनर (कर्णधार), सोफी डिव्हाईन, भारती फुलमाली, कनिका आहुजा, काशवी गौतम, रेणुका सिंग ठाकूर, हॅपी कुमारी






