Redmi Watch 6: 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि AMOLED कलर डिस्प्ले.... अशी आहे Redmi ची लेटेस्ट स्मार्टवॉच
टेक कंपनी Xiaomi चा सबब्रँड असलेल्या रेडमीने त्यांचे लेटेस्ट स्मार्टवॉच Redmi Watch 6 अखेर लाँच केले आहे. हे लेटेस्ट स्मार्टवॉच अपडेटेड डिझाइन आणि अधिक चांगल्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आले आहे. रेडमीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टवॉचमध्ये 2.07-इंचाचा AMOLED कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 432×514 पिक्सेल आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 82 टक्के आहे. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2000 निट्स आणि रिफ्रेश रेट 60 Hz आहे, जो ऑलवेज ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो. या वॉचला 2.5D कर्व्ड ग्लास आणि अनेक वॉच फेससह बाजारात लाँच करण्यात आले आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टवॉचच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Redmi Watch 6 हे स्मार्टवॉच चीनमध्ये CNY 599 म्हणजेच सुमारे 7,400 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच ब्लू मून सिल्व्हर, एलिगंट ब्लॅक आणि मिस्टी ब्लू रंगाच्या पर्यायात सादर केले आहे. हे स्मार्टवॉच भारतात कधी लाँच केले जाणार, त्याची भारतात किंमत किती असणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – X)
Redmi Watch 6 वॉचला Xiaomi Surge OS 3 सह Super Island इंटरफेससह सादर करण्यात आलं आहे, जो फ्लूइड परफॉर्मंस आणि अधिक चांगली डिवाइस कनेक्टिविटी ऑफर करतो. यासोबतच कन्वर्ज्ड डिवाइस सेंटरसह यूजर्स त्यांचे स्मार्ट डिव्हाईस या वॉचद्वारे कंट्रोल करू शकतात. कंपनीने लाँच केलेले हे लेटेस्ट स्मार्टवॉच WeChat क्विक रिप्लाय सपोर्टसह लाँच करण्यात आले आहे.
Redmi Watch 6 वॉचमध्ये यूजर्सना 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहे. यापैकी 6 स्पोर्ट्स मोड्सना हे वॉच ऑटो डिटेक्ट करते. याशिवाय या स्मार्टवॉचमध्ये यूजर्सना अनेक हेल्थ ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनीटरिंग, ब्लड ऑक्सीजन (SpO2), स्लीप आणि स्ट्रेस ट्रॅकिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. रेडमीच्या या वॉचमध्ये कंपनीने हार्ट रेट सेंसर, जायरोस्कोप, एक्सेलेरोमीटर, एंबिएंट लाइट सेंसर आणि जियोमैग्नेटिक सेंसरचा सपोर्ट दिला आहे.
या वॉचमध्ये कंपनीने 550mAh बॅटरी दिली आहे. Watch 6 बाबत कंपनीने असा दावा केला आहे की, नियमित वापरासह ते 12 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ ऑफर करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.4, एनएफसी आणि 5एटीएम वॉटर रेझिस्टन्सचा समावेश आहे.






