Samsung Galaxy S25 FE (Photo Credit- X)
Samsung ने अखेर आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Galaxy S25 FE बाजारात आणला आहे. हा फोन फेब्रुवारीमध्ये लाँच झालेल्या Galaxy S25 मालिकेतील एक नवीन आणि दमदार एडिशन आहे. या फोनमध्ये अनेक शक्तिशाली AI फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे तो बाजारातील इतर फोन्सना, विशेषतः Vivo X200 FE ला जोरदार टक्कर देईल.
Samsung Galaxy S25 FE launched in India🇮🇳
📱6.7″ FHD+ Dynamic AMOLED 120Hz Refresh Rate Display
💾Exynos 2400 (4nm) SoC
📸50MP (Main) OIS + 12MP (Ultrawide) + 8MP (3x Telephoto) Rear Cameras
🤳12MP Front Camera
🔋4900mAh Battery
⚡45W Wired + 15W Wireless Charging
⚙️ Android… pic.twitter.com/77K6f7xe4y— TrakinTech (@TrakinTech) September 4, 2025
हे देखील वाचा: 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार फोन! आयटेल A90 Limited Edition लाँच, मिळतात ‘हे’ खास फीचर्स
भारतात Galaxy S25 FE दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे:
हा फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. यासोबतच, 6 महिन्यांसाठी Google AI Pro प्लॅन मोफत मिळत आहे, ज्यामध्ये Gemini, Flow आणि NotebookLM चे प्रीमियम फीचर्स वापरता येतात. सॅमसंगने या फोनसाठी 7 वर्षांचे सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.
Galaxy S25 FE बाजारात Vivo X200 FE ला थेट स्पर्धा देणार आहे. Vivo X200 FE मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले, Dimensity 9300+ प्रोसेसर आणि 6,500mAh ची बॅटरी आहे. तसेच, यात 50MP + 8MP + 50MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Vivo X200 FE सध्या ₹54,999 मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे, किंमत आणि फीचर्सच्या बाबतीत या दोन्ही फोन्समध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.