मोबाइल फोन्सच्या कंपन्यांमध्ये सॅमसंगचे नाव नेहमीच चर्चेत असतं. त्यातच आता सॅमसंगबद्दलची नवीन बातमी समोर येत आहे. येत्या काळात सॅमसंग लवकरच आपल्या समर लाँच इव्हेंटमध्ये “गॅलेक्सी अनपॅक ” इव्हेंटचे आयोजन करणार आहे. यामध्ये सॅमसंग आपले फोल्डेबल स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. मागील वर्षाच्या सुरवातीलाच, कंपनीने जुलैमध्ये Galaxy Z Fold 5 और Galaxy Z Flip 5 लाँच केले होते. रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग यावर्षीही जुलैमध्ये आपले समर इव्हेंट आयोजित करू शकते. आज आम्ही तुम्हाला आगामी अनपॅक्ड 2024 बद्दलची माहिती शेअर करणार आहोत.
Galaxy Unpacked 2024: Z Flip 6 आणि Z Fold 6 ची रिलीज डेट
सॅमसंगच्या लाँच इव्हेंटबद्दल असा दावा केला जात आहे की, हा इव्हेंट १० जुलैला आयोजित केला जाऊ शकतो. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळ सुरू होण्याच्या सुमारे दोन आठवडे आधीच हा लॉन्च इव्हेंट आयोजित केला जाईल. यावेळी, कंपनी गॅलेक्सी Z Fold 6 आणि Z Flip 6 स्मार्टफोन्ससोबत वियरेबल Galaxy Ring लाँच करू शकते.
[read_also content=”कमी किमतीत अवघ्या काही तासातच चार्ज होतात हे 5G स्मार्टफोन्स https://www.navarashtra.com/technology/these-low-prices-5g-smartphones-are-charges-in-just-few-hours-538445.html”]
कोण कोणत्या गोष्टी होऊ शकतील लाँच
ससॅमसंगच्या आगामी Galaxy Z सिरींजबद्दल असे बोलण्यात येत आहे की, यामध्ये ऑन डिव्हाइस AI फिचर दिले जाऊ शकते. हे फिचर जानेवारीमध्ये लाँच झालेल्या Galaxy S24 मॉडेलसारखे असेल. याबरोबरच अशी आशा आहे की, कंपनी हेल्थकेअर गॅजेट Galaxy Ring देखील सादर करेल. यावर्षी स्पेनमध्ये आयोजित Mobile World Congress मध्ये या रिंगला दाखवण्यात आले होते.
काय असेल Galaxy Z Fold 6 मध्ये खास
हा Galaxy Z Fold 6 स्मार्टफोन टायटॅनिक फ्रेम आणि स्लीकर डिजाइनसोबत सादर केला जाईल. सॅमसंगचा हा फोन फोल्डेबल OLED पॅनल, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरसह दिला जाईल. कॅमेराबद्दल बोलले जात आहे की, यात मागील मॉडलसारखाच कॅमेरा दिला जाईल. हा मोबाईलमध्ये 12 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज दिले जाईल. यासोबतच हा फोन Android 14 वर आधारित OneUI 6.1 वर चालेल. या फोनमध्ये GalaxyAI फीचर्स उपलब्ध असतील. फोनमध्ये 4600mAh बॅटरी असेल आणि 25W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असेल.