सॅमसंग गॅलेक्सीच्या नव्या ऑफर्स
आजपासून, गॅलॅक्सी झेड फोल्ड६ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मर्यादित कालावधीच्या फेस्टिव्ह ऑफरचा भाग म्हणून अपग्रेड बोनस किंवा १२५०० रूपयांच्या बँक कॅशबॅकसह २४ महिने नो-कॉस्ट ईएमआय मिळेल. तसेच, गॅलॅक्सी झेड फ्लिप६ खरेदी करणारे ग्राहक अपग्रेड बोनस किंवा ११००० रूपयांच्या बँक कॅशबॅकसह २४ महिने नो-कॉस्ट ईएमआयसाठी पात्र ठरतील. गॅलॅक्सी झेड फोल्ड६ ची किंमत १६४९९९ रूपयांपासून सुरू होते आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप६ ची किंमत १०९९९९ रूपयांपासून सुरू होते. अधिक किफायतशीरपणाचा शोध घेणारे ग्राहक सोईस्कर ईएमआय योजनांचा लाभ घेऊ शकतात, जेथे ईएमआय गॅलॅक्सी झेड फ्लिप६ साठी ३०५६ रूपयांपासून आणि गॅलॅक्सी झेड फोल्ड६ साठी ४५८४ रूपयांपासून सुरू होतो.
अशुरन्सदेखील मिळणार
तसेच, गॅलॅक्सी झेड फोल्ड६ किंवा गॅलॅक्सी झेड फ्लिप६ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फक्त ९९९ रूपयांमध्ये गॅलॅक्सी झेड अशुअरन्स मिळेल. संपूर्ण डिवाईस संरक्षण देणाऱ्या गॅलॅक्सी झेड अशुअरन्स प्रोग्रामची मूळ किंमत गॅलॅक्सी झेड फोल्ड६ साठी १४९९९ रूपये आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप६ साठी ९९९९ रूपये होती. झेड अशुअरन्स प्रोग्राम अंतर्गत, ग्राहक आता एका वर्षात दोन क्लेम्सचा लाभ घेऊ शकतात.
नवीन फोल्डेबल्स आतापर्यंतचे सर्वात स्लिम व वजनाने हलके गॅलॅक्सी झेड सिरीज डिवाईसेस आहेत आणि परिपूर्ण सममितीय डिझाइनसोबत स्ट्रेट एजेससह (कडा) येतात. गॅलॅक्सी झेड सिरीज सुधारित आर्मर अॅल्युमिनिअम आणि कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस २ सह देखील सुसज्ज आहे, ज्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ गॅलॅक्सी झेड सिरीज आहे. गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि फ्लिप६ मध्ये स्नॅपड्रॅगन® ८ जेन ३ मोबाइल प्लॅटफॉर्म फॉर गॅलॅक्सी हे सर्वात प्रगत स्नॅपड्रॅगन मोबाइल प्रोसेसर, तसेच दर्जात्मक सीपीयू, जीपीयू आणि एनपीयू कार्यक्षमता आहे. प्रोसेसर एआय प्रोसेसिंगसाठी ऑप्टिमाइज करण्यात आले आहे आणि एकूण कार्यक्षमतेसह सुधारित ग्राफिक्स देते.
हेदेखील वाचा – लवकरच लाँच होणार Vivo चा 32MP सेल्फी कॅमरा आणि 5000 mAh बॅटरी वाला 5G स्मार्टफोन
काय आहे टूल्स
गॅलॅक्सी झेड फोल्ड६ मध्ये अनेक एआय-समर्थित वैशिष्ट्ये व टूल्स आहेत, जसे नोट असिस्ट, कंपोजर, स्केच टू इमेज, इंटरप्रीटर, फोटो असिस्ट आणि इन्स्टण्ट स्लो-मो, जे मोठ्या स्क्रिनचा आकार वाढवण्यासह उत्पादकता वाढवतात. गॅलॅक्सी झेड फोल्ड६ मध्ये दीर्घकाळापर्यंत गेमचा आनंद घेण्यासाठी १.६ पट मोठी वेपर चेम्बर आहे आणि रे ट्रेसिंग त्याच्या ७.६-इंच स्क्रिनवर वास्तविक ग्राफिक्सचा अनुभव देते, जे अधिक सर्वोत्तम गेमिंग अनुभवासाठी जवळपास २,६०० नीट्सचा तेजस्वी डिस्प्ले देते.
उत्तम डिव्हाईस
गॅलॅक्सी झेड फ्लिप६ मध्ये नवीन कस्टमायझेशन व क्रिएटिव्हीटी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे वापरकर्ते प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. ३.४-इंच सुपर एएमओएलईडी फ्लेक्सविंडोसह डिवाईस सुरू करण्याची गरज न भासता एआय-असिस्टेड फंक्शन्स वापरता येऊ शकतात. तसेच, वापरकर्ते सुचवलेल्या प्रतिक्रियांसह टेक्स्ट्सना प्रतिक्रिया देऊ शकतात, जे नवीन मेसेजेसचे विश्लेषण करत सर्वोत्तम प्रतिक्रियेचा सल्ला देतात.
झूमची फ्लेक्सिबिलिटी
नवीन ऑटो झूमसह फ्लेक्सकॅम वस्तूला ओळखत फोटोसाठी सर्वोत्तम फ्रेम आपोआपपणे देतो आणि कोणत्याही आवश्यक अॅडजस्टमेंट्सपूर्वी झूम इन व झूम आऊट करतो. नवीन ५० मेगापिक्सल वाइड आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेन्सर्स सुस्पष्ट व आकर्षक फोटोंसह अपग्रेडेड कॅमेरा अनुभव देतात. गॅलॅक्सी झेड फ्लिप६ आता अधिक बॅटरी क्षमतेसह येतो आणि पहिल्यांदाच त्यामध्ये वेपर चेंबर आहे.
हेदेखील वाचा – स्वस्त iPhone SE 4 लाँचची तयारी सुरु, ऍपल इंटेलिजेंस आणि 48MP कॅमेरासह करणार एंट्री
कशा पद्धतीचे संरक्षण
गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि झेड फ्लिप६ ला सॅमसंग गॅलॅक्सीचे डिफेन्स-ग्रेड सॅमसंग नॉक्सचे संरक्षण देण्यात आले आहे. हे मल्टी-लेयर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म महत्त्वपूर्ण माहितीचे संरक्षण करण्यासोबत एण्ड-टू-एण्ड हार्डवेअर, रिअल-टाइम थ्रेट डिटेक्शन आणि कोलॅबोरटिव्ह प्रोटेक्शनसह असुरक्षिततांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि झेड फ्लिप६ सर्व आघाडीच्या ऑनलाइन व ऑफलाइन रिटेलमध्ये उपलब्ध आहेत.