फोटो सौजन्य - Social Media
सॅमसंग इंडियाने आपला नेक्स्ट-जेनरेशन मोबाइल सीटी उत्पादन पोर्टफोलिओ भारतात लाँच केला आहे, ज्यामध्ये रुग्ण-केंद्रित डिझाइन, एआय-सहाय्यक इमेजिंग आणि गतिशीलतेचा संगम आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडची उपकंपनी न्यूरोलॉजिका यांच्या सहकार्याने आणलेल्या या सीटी स्कॅनर श्रेणीमुळे रुग्णांना बेडवरच इमेजिंग सुविधा मिळणार असून, सुरक्षितता वाढेल आणि उपचार निर्णय जलद घेता येतील. हे सोल्यूशन्स मेट्रो तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णालयांनाही सक्षम करतील.
या पोर्टफोलिओमध्ये सेरेटॉम एलाइट, ओम्नीटॉम एलाइट, ओम्नीटॉम एलाइट पीसीडी आणि बॉडीटॉम ३२/६४ यांचा समावेश आहे. सेरेटॉम एलाइट ८-स्लाइस स्कॅनर असून २ तास बॅटरी क्षमतेसह कार्यक्षम इमेजिंग करतो. ओम्नीटॉम एलाइटमध्ये ४० सेमी ओपनिंग, अल्ट्रा हाय रिझोल्यूशन मोड आणि १.५ तास बॅटरी क्षमता आहे, तसेच डीप ब्रेन स्टिम्युलेशनसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची क्षमता आहे. ओम्नीटॉम एलाइट पीसीडीमध्ये प्रगत फोटॉन काउंटिंग डिटेक्टर तंत्रज्ञान असून उच्च दर्जाचे इमेजेस आणि सुधारित आर्टिफॅक्ट रिडक्शन मिळते. बॉडीटॉम ३२/६४ हे पूर्ण शरीरासाठी डिझाइन केलेले ३२/६४ स्लाइस स्कॅनर असून ८५ सेमी ओपनिंग आणि १२ तास टिकणारी लिथियम पॉलिमर बॅटरी आहे.
सॅमसंगचे मोबाइल सीटी सोल्यूशन्स न्यूरोसर्जरी, आपत्कालीन विभाग, ऑन्कोलॉजी, पीडियाट्रिक युनिट्ससह अनेक विभागांमध्ये उपयुक्त आहेत. इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीमध्ये बायोप्सी, ड्रेनेज व अॅबलेशनसाठी हे स्कॅनर कार्यक्षम ठरतात, तर पेडियाट्रिक इमेजिंगसाठी सुरक्षित उपाय उपलब्ध होतो.
सॅमसंग इंडियाच्या एमएमई बिझनेस प्रमुख अतनु दास गुप्ता यांनी सांगितले की, “मोबाइल सीटी पोर्टफोलिओमुळे भारतात प्रगत वैद्यकीय इमेजिंग अधिक उपलब्ध होईल, आरोग्यसेवा प्रदात्यांना सक्षम करेल आणि रुग्ण निष्पत्ती सुधारेल.” या सिस्टीम्स हॉस्पिटल पीएसीएस व ईएमआर सिस्टीम्ससोबत सहज एकत्रित होतात, ज्यामुळे जलद आणि अचूक निदान मिळते.
सॅमसंगचे हे पाऊल आरोग्यसेवेच्या डिजिटल परिवर्तनाला चालना देत असून, भारतातील आरोग्य पायाभूत सुविधांना अधिक मजबूत करण्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे.