पुढील काही तासांत राज्यभरात पावसाची शक्यता (फोटो - ani)
IMD Rain Alert: राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान वरुणराजा देखील बाप्पाच्या स्वागतासाठी हजेरी लावताना दिसून येत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाड्याला तर पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. येत्या काही तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पवससाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पुढील काही तासांमध्ये देखील मराठवाडा तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाडा, कोकण आणि विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. घाटमाथा, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच चंद्रपूर, भंडारा, नांदेड , गोंदिया जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert: कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा; ऐन गणेशोत्सवात झोडपणार, मुंबई, पुण्यात तर…
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात देखील पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
विदर्भात कोसळधार
राज्यातील कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात व लतूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.
हवामान विभागाने राज्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. कोकण, पश्चिम महराष्ट्र व विदर्भात काही भागात पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला होता.