फोटो सौजन्य: iStock
भारतातील प्रत्येक छोट्या आणि मोठ्या शहरात ऑटो रिक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. यातही आता मार्केटमध्ये इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांना चांगली मागणी मिळत आहे. मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटरनंतर आता इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा सुद्धा दाखल होत आहे, ज्यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
भारतात, महानगरांपासून ते शहरं आणि खेड्यांपर्यंत, तीनचाकी ऑटो रिक्षा दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. यासोबतच, त्या लोकांच्या रोजगाराचे साधन देखील बनले आहे. प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी असो किंवा शेवटच्या मैलापर्यंत डिलिव्हरी करण्यासाठी असो, दैनंदिन वापरासाठी ऑटो रिक्षा एक उत्तम पर्याय बनल्या आहेत.
अलिकडच्या काळात, अनेक प्रकारच्या ऑटो रिक्षा येत आहेत, ज्या डिझेल इंधन, सीएनजी आणि इलेक्ट्रिक बॅटरीवर चालतात. इलेक्ट्रिक आणि सीएनजी रिक्षामध्ये कोणते वाहन खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरेल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
ड्रायव्हिंग दरम्यान केल्यात 4 चुका, कार मायलेज येईल धाडकन खाली; सतत भरावे लागेल पेट्रोल
भारतात, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा 2.5 लाख ते 3.5 लाख रुपयांच्या किमतीत मिळतात. दुसरीकडे, सीएनजी ऑटो रिक्षा 2 लाख ते 2.5 लाख रुपयांच्या किमतीत विकली जाते. म्हणजेच, जर बजेट मर्यादित असेल आणि तुम्हाला सुरुवातीला कमी खर्च करायचा असेल, तर सीएनजी हा एक स्वस्त आणि उत्तम पर्याय आहे, परंतु इलेक्ट्रिकची जास्त किंमत दीर्घकाळात बचत करून देऊ शकते.
इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा चार्जिंग खर्च प्रति किलोमीटर 0.5 ते 0.7 रुपये असतो. दुसरीकडे, सीएनजीचा खर्च प्रति किलोमीटर 2.5 ते 3 रुपये असतो.
समजा, जर तुम्ही दररोज 100 किलोमीटर रिक्षा चालवली तर तुम्हाला इलेक्ट्रिक ऑटो रिक्षासाठी 60–70 रुपये खर्च करावे लागतील, तर सीएनजी ऑटो रिक्षासाठी 250–300 रुपये खर्च करावे लागतील. अशा प्रकारे, इलेक्ट्रिक रिक्षा वापरून तुम्ही महिन्याला सुमारे 5000-6000 रुपये वाचवू शकता. हाच खरा फायदा आहे, जो दीर्घकाळात इलेक्ट्रिक रिक्षाला एका चांगला पर्याय बनवतो.
इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांना इंजिन ऑइल, फिल्टर, स्पार्क प्लग यासारख्या गोष्टींची आवश्यकता नसते. त्या कमी पार्ट्सवर चालतात, त्यामुळे रिक्षा कमी बिघडते आणि मेंटेनन्स स्वस्त असते.
गोंडलच्या महाराजांजवळ आहे AMG च्या 9 पॉवरफुल कार्स, कलेक्शन पाहून व्हाल हैराण
सीएनजी ऑटो रिक्षांना वेळोवेळी ट्यूनिंग, फिल्टर बदलणे आणि नियमित सर्व्हिस आवश्यक आहे. या मेंटेनन्ससाठी खूप पैसे खर्च होतात. म्हणजेच, इलेक्ट्रिक वाहन कोणत्याही त्रासाशिवाय जास्त काळ चालते.
जर तुम्ही शहरापुरती ऑटो रिक्षा चालवत असाल आणि चार्जिंगची सुविधा देखील सहज उपलब्ध असेल, तर इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला दररोज लांबचा प्रवास करावा लागत असेल तर तुम्ही सीएनजी ऑटो रिक्षा खरेदी करू शकता.