
Samsung ची लोकप्रिय Galaxy Z Flip सीरीज होणार बंद? टिप्स्टरने दिले महत्त्वाचे संकेत, वाचा सविस्तर
अखेर कीबोर्डचे रहस्य उलघडलेच! ABCDE ऐवजी QWERTY क्रम का? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित
कंपनीच्या आगामी ईव्हेंटबाबत चर्चा सुरू असतानाच आता टिप्स्टर आइस युनिव्हर्सने एक पोस्ट शेअर करत मोठा धमाका केला आहे. टिप्स्टरने शेअर केलेल्या नवीन लिकनुसार सॅमसंग पुढील वर्षी त्यांची लोकप्रिय गॅलेक्सी झेड फ्लिप सीरीज बंद करू शकते. सॅमसंगने या रिपोर्टची पुष्टी केली नाही. तसेच कंपनीने याबाबत कोणते विधान देखील केले नाही. त्यामुळे टिप्स्टरने शेअर केलेली माहिती सध्या केवळ एक अफवा असल्याचे मानले जात आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
समोर आलेल्या माहितीनुसार, सॅमसंग त्यांची लोकप्रिय गॅलेक्झी झेड फ्लिप सीरीज बंद करण्याचे एक मोठे कारण सॅमसंगचे वाढते फोल्डेबल पोर्टफोलियो असू शकते. असं म्हटलं जातं आहे की, यावर्षी गॅलेक्झी झेड फोल्ड 8 आणि मोठा गॅलेक्झी झेड फोल्ड 8 अल्ट्रा दोन्ही ऑफर करणार आहे. जर स्टँडर्ड फोल्ड मॉडेल जास्त कॉम्पॅक्ट आणि वापरण्यासाठी सोपे असेल तर सॅमसंगच्या लाइनअपमधील स्वतंत्र क्लॅमशेल फोल्डेबल्सची गरज कमी होऊ शकते.
दुसरे कारण असू शकते किंमत. इंडस्ट्री रिपोर्ट्समधून समजते की, वाढत DRAM आणि मेमोरी कॉस्ट स्मार्टफोन मेकर्ससाठी प्रोडक्शन खर्च वाढवत आहे. यामुळे गॅलेक्झी झेड फ्लिप 8 चे कथित 256GB व्हेरिअंट सुमारे EUR 1,299 च्या किमतीत लाँच केले जाऊ शकते. या किंमतीत हा फोन थेट प्रीमियम फ्लॅगशिप फोन्ससोबत स्पर्धा करणार आहे. जिथे ग्राहक दमदार कॅमेरा, मोठी बॅटरी आणि जास्त ट्रेडिशनल हार्डवेयर मिळण्याची अपेक्षा करतात.
रिपोर्ट्स सांगतात की, गॅलेक्सी झेड फ्लिप 8 बाजारात येण्यापूर्वी गॅलेक्सी झेप फ्लिप सिरीजच्या भविष्यावर निर्णय होण्याची शक्यता नाही. ब्रँड असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ग्राहकांची मागणी आणि सेल्स परफॉर्मंसचा आढावा घेईल. दुसऱ्या रिपोर्ट्समध्ये असे संकेत दिले जात आहेत की, कंपनी ही स्मार्टफोन लाईनअप कायमची बंद करणार नाही. याऐवजी, सॅमसंग एक जनरेशन स्किप करेल आणि ममोरीच्या किंमती स्थिर झाल्यानंतर फ्लिप सिरीजचे पुनरागमन केले जाईल. ज्यामुळे कंपनी हे डिव्हाईस अधिक स्पर्धात्मक किमतीत सादर करू शकेल. सध्या सॅमसंग त्यांची गॅलेक्सी झेड फ्लिप सिरीज बंद करणार का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.