अखेर कीबोर्डचे रहस्य उलघडलेच! ABCDE ऐवजी QWERTY क्रम का? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित
किबोर्डचा संबंध 150 वर्षे जुन्या टाइपराइटरशी आहे. सुरुवातीला टाइपराइटरमध्ये ABCDE या क्रमाने असतील, तर शेजारील बटणे दाबल्याने धातूच्या सळ्या एकमेकांवर आदळत असत. यामुळे अनेकदा मशीन जाम होऊन त्याचा वेग मंदावत असे. (फोटो सौजन्य: Pinterest)
मशीन जाम होऊ नये आणि त्याचा वेग मंद होऊ नये, यासाठी इंजिनिअर्सनी अक्षरांना असे सेट केले ज्यामुळे जास्त वापर होणारी बटन एकमेकांपासून दूर राहतील. यानंतर सुरु झाले किबोर्डचे QWERTY लेआउट. हेच लेआऊट आज देखील प्रत्येक किबोर्डमध्ये वापरले जाते. QWERTY लेआउट किबोर्डचा उद्देश टाईपिंगचा वेग वाढवणं नाही तर टाइपराइटर जाम होण्याची समस्या सोडवणं असा आहे.
आज तंत्रज्ञान प्रचंड बदलले आहे. प्रत्येक क्षेत्रात ॲडव्हांस तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये किबोर्डचा देखील समावेश आहे. म्हणजेच सध्याच्या काळात वापरल्या जाणाऱ्या किबोर्डमध्ये ना धातूच्या सळ्या आहेत आणि ना तो सतत अडकण्याची भीती आहे. मग तरी देखील जुन्या लेआऊटचा वापर का केला जात आहे? यामागील कारण म्हणजे सवय आणि ट्रेनिंग. करोडो लोकं QWERTY लेआउटवर टाईप करण शिकले आहेत. अशा परिस्थितीत जर आता अचानक ABCDE क्रम असणारा किबोर्ड वापरात आला, तर लोकांचा गोंधळ उडू शकतो आणि लोकं टाईप करू शकत नाहीत.
ABCDE क्रम असणारा किबोर्डचा वापर ऐकयला सोपा वाटत असला तरी यामध्ये लोकांचा फार गोंधळ उडू शकतो. तसेच यामध्ये बोटांच्या हालचाली जास्त थकू शकता. QWERTY लेआउटमध्ये बोटांच्या नैसर्गिक स्थितीचा विचार केला जातो, ज्यामुळे दीर्घकाळ टायपिंग करणे सोपे होते. किबोर्डचे डिझाईन सुविधेपेक्षा जास्त इतिहास आणि सवयीवर अवलंबून आहे. तंत्रज्ञान बदलले असले तरी देखील मानवी सवयी इतक्या सहज बदलत नाहीत. म्हणूनच ABCDE वर्णमालेच्या सरळ रेषा आजही फक्त पुस्तकांमध्ये दिसतात, कीबोर्डवर नाही.






