अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सने यूजर्स त्रस्त! अवघ्या ६ महिन्यांत २० लाखांहून अधिक तक्रारी दाखल
7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत
याचा अर्थ असा की, मागील संपूर्ण वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्रासदायक कॉल्सबद्दल आलेल्या तक्रारींपैकी जवळपास ७०% तक्रारी याच तिमाहीत प्राप्त झाल्या आहेत. राज्यसभा सदस्य संजय सिंह यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले, अॅक्सेस प्रोव्हायडर्सकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून २०२६ दरम्यान कंपन्यांना मिळालेल्या अवांछित कॉल्स आणि मेसेजेसच्या २० लाखांहून अधिक तक्रारींपैकी ८२% पेक्षा अधिक, म्हणजेच अंदाजे १७.२१ लाख तक्रारी, नोंदणी नसलेल्या किंवा अज्ञात टेलिमार्केटर्सविरुद्ध होत्या. याचा अर्थ असा की, प्रत्येक १०० तक्रारींपैकी ८२ पेक्षा तक्रारी अज्ञात नंबर किंवा कंपन्यांकडून होत्या, त्या कुठल्याही नोंदणीशिवाय कॉल मेसेज करून लोकांना त्रास देत होत्या. (फोटो सौजन्य – AI Created)
भारतातील खासगी दूरसंचार कंपन्या, भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया यांनी ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. त्यांच्या महसुलासोबतच, कंपन्यांनी त्यांच्या वापरकर्त्यांच्या मासिक डेटा वापराची माहितीही उघड केली. रिलायन्स जिओचे ग्राहक भारतातील सर्वाधिक मोबाईल डेटा वापरकर्ते आहे. या यादीत भारती एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर असली तरी, प्रति ग्राहक महसुलाच्या बाबतीत ती उद्योगात आघाडीवर आहे. डेटा वापराच्या बाबतीत व्होडाफोन आयडियाचे वापरकर्ते या दोन मोठ्या कंपन्यांच्या मागे आहेत. भारतातील तिन्ही कंपन्यांच्या वापरकत्यांना एकत्र केल्यास, प्रत्येक वापरकर्ता दरमहा ९९.८ जीबी मोबाईल डेटा वापरत आहे.
भारती एअरटेलने कळविले आहे की, एक सरासरी वापरकर्ता दरमहा ३४.४ जीबी मोबाईल डेटा वापरतो. याचा अर्थ दररोज अंदाजे १.१५ जीबी डेटा असा होतो. या तीन महिन्यांत, एअरटेलच्या ग्राहकांनी एकत्रितपणे ३१,०६२ कोटी जीबी इंटरनेट वापरले, म्हणजेच अंदाजे ३,१०६ कोटी जीबी. त्यामुळे उद्योगात प्रति ग्राहक सर्वाधिक सरासरी महसूल देखील मिळाला. तिमाहीसाठी एअरटेलचा एकूण नेटवर्क डेटा व्हॉल्यूम ३१,०६२ कोटी जीबी होता.
मंत्र्यांनी सांगितले की, नोंदणीकृत टेलिमार्केटर्सवरही कारवाई करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान ४१ नोदणीकृत टेलिमार्केटर्सना, २०२५ मध्ये १२ जणांना आणि या वर्षी जूनपर्यंत सात जणांना काळ्या यादीत टाकण्यात आले.
२०२५ मध्ये एकूण ३१.०९ लाखांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. २०२१ मध्ये त्रासदायक कॉलसंविरुद्ध १२.८४ लाखांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यानंतर, २०२२ मध्ये तक्रारीची संख्या १०.८३ लाखांपर्यंत कमी झाली. २०२३ मध्ये तक्रारींमध्ये अंदाजे २६% वाढ होऊन त्या १३.६२ कोटी झाल्या, त्यानंतर २०२४ मध्ये ४२% वाढून १९.३८ कोटी आणि २०२५ मध्ये ६०% वाढून ३१.०९ कोटी झाल्या. त्रासदायक कॉल करणाऱ्याऱ्यांविरुद्धच्या तक्रारीची संख्याही वाढली आहे.
यूजर्सची प्रतिक्षा संपली! Google Pixel 11 सीरीज भारतात लाँच; वाचा फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान त्रासदायक कॉल करणाऱ्याऱ्यांमुळे १९.२१ कोटी टेलिकॉम कनेक्शन खंडित करण्यात आले. २०२५ मध्ये टेलिकॉम कनेक्शन खंडित करण्याची संख्या १९.४ कोटीपर्यंत कमी झाली आणि २०२६ च्या पहिल्या सहामाहीत केवळ ७९,००० टेलिकॉम कनेक्शन खंडित करण्यात आले. तथापि, त्रासदायक कॉल आणि संदेश पाठवणान्या संस्थांविरुद्धच्या कारवाईत सातत्याने वाढ झाली आहे.

