Free Fire Max: गॅदर अराऊंड ईमोटसह प्लेअर्सन मिळणार 'हे' स्पेशल रिवॉर्ड्स, गेममध्ये स्टेप अप इव्हेंट लाईव्ह
ईमोट ही फ्री फायर मॅक्स गेममध्ये असे इन-गेम आइटम आहे, ज्याद्वारे प्लेअर्स गेममध्ये त्यांच्या कॅरेक्टरला यूनिक अॅक्शन प्रोवाइड करू शकतात. असे अनेक प्लेअर्स असतात ज्यांना ईमोटवर इन-गेम करंसी खर्च करण्याची इच्छा नसते. त्यामुळे असे प्लेअर्स सहसा ईव्हेंटच्या शोधात असतात. तुम्ही देखील अशाच प्लेअर्सपैकी एक असाल तर हा ईव्हेंट तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुमच्या गेमिंग कॅरेक्टरसाठी तुम्ही ईमोट्स खरेदी करण्याचा विचार करत असाल स्टेप अप ईमोट ईव्हेंट तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन तुम्ही इमोट्स फ्री ग्रँड प्राइज म्हणून जिंकू शकता. यामध्ये अनेक बोनस बक्षिसे देखील समाविष्ट आहेत. या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्हाला स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करून तुमचे नशीब आजमावावे लागेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्सच्या स्टेप अप ईमोट्स ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना त्यांचं नशिब आजमावे लागणार आहे. नशिब आजमवण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. स्पिन करण्यासाठी इन-गेम करेंसी डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्याची किंमत 9 डायमंड्स आहेत.






