फोटो सौजन्य - Social Media
या कार्यक्रमाची शोभा माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक व्यवहार मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीने आणखी वाढली. त्यांनी महाराष्ट्रातील AVGC-XR (अॅनिमेशन, VFX, गेमिंग, कॉमिक्स, एक्स्टेंडेड रिअॅलिटी) क्षेत्रातील प्रगती आणि सरकारच्या सहाय्यक धोरणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शेलार यांनी राज्य सरकार तंत्रज्ञान, सांस्कृतिक पायाभूत सुविधा आणि उद्योग-सहयोग वाढवून तरुण कलाकारांना जागतिक पातळीवरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात पॅनेल डिस्कशन, मार्गदर्शक सत्रे, तज्ज्ञांचे बीजभाषण आणि उद्योगातील प्रत्यक्ष उदाहरणांसह विद्यार्थ्यांना स्टुडिओ-रेडी कौशल्यांची दिशा देण्यात आली. विविध शहरांतील पूर्वीच्या पर्वांनी घडवलेला वारसा आणि उल्लेखनीय सहभाग या मुंबई चॅप्टरमध्येही दिसून आला.
अॅप्टेक लिमिटेडचे ग्लोबल रिटेलचे चीफ बिझनेस ऑफिसर आणि MAAC चे ब्रँड कस्टोडियन संदीप वेलिंग म्हणाले, “मॅक मॅनिफेस्ट म्हणजे संधी आणि मार्गदर्शनाचा संगम. विद्यार्थ्यांनी वर्गातील शिक्षणापासून थेट प्रत्यक्ष करिअरपर्यंतचा प्रवास आत्मविश्वासाने करावा, हेच आमचे ध्येय आहे.” कार्यक्रमातील तज्ज्ञ, उपस्थित उद्योग प्रतिनिधी, विद्यार्थी आणि विशेषत: अॅड. आशिष शेलार यांच्या सहभागामुळे मॅक मॅनिफेस्ट मुंबई २०२५ अत्यंत यशस्वी ठरला आणि सर्जनशील करिअरची स्वप्ने पाहणाऱ्या युवकांना नवे मार्ग खुले झाले.






